Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court: “निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करा”; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस

राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर निश्चित मर्यादा घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची दखल घेत, न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 07:38 PM
सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस (Photo Credit- AI)

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

  • “निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करा”
  • सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस
  • पाहा काय म्हणाले…
नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षांकडून होणाऱ्या अफाट पैशांच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले आहे. राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर निश्चित मर्यादा घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची दखल घेत, न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे. या निर्णयामुळे आगामी काळात निवडणुकीतील ‘धनशक्ती’च्या बेलगाम वापराला चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकशाहीच्या पायाला धनशक्तीचा धोका: प्रशांत भूषण

‘कॉमन कॉज’या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणी दरम्यान भूषण यांनी असा तर्क मांडला की, “निवडणुकीत राजकीय पक्षांकडून होणारा पैशांचा अनिर्बंध वापर लोकशाहीच्या मूळ पायालाच धक्का लावत आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया असंतुलित होत असून सामान्य उमेदवार आणि श्रीमंत राजकीय पक्ष यांच्यातील दरी वाढत आहे.”

सुप्रीम कोर्ट ने कांग्रेस नेता जया ठाकुर की याचिका पर केंद्र सरकार और चुनाव आयोग को नोटिस जारी किया ◆ याचिका में चुनाव आयुक्तों को कानूनी कार्रवाई से आजीवन छूट देने वाले कानून को चुनौती दी गई है ◆ CJI सूर्यकांत की बेंच ने कहा कि इस प्रावधान की संवैधानिक जांच की जाएगी — Ravindra Singh Sheoran (@TellingRavindra) January 12, 2026

प्रशांत भूषण यांनी यावेळी ‘इलेक्टोरल बॉन्ड’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचा दाखला दिला. अनियंत्रित धनशक्तीमुळे लोकशाही प्रक्रिया विकृत होते आणि मतदारांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येते, हे न्यायालयाने यापूर्वीच मान्य केले आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

“खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस

पाच वर्षांतील बदलांवर न्यायालयाची टिप्पणी

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक खर्चावरील मर्यादांच्या व्यावहारिक आव्हानांवर प्रश्न उपस्थित केले. “अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्येही निवडणूक खर्चावर मर्यादा आहेत, मात्र तिथे उमेदवार आपल्या मित्रांमार्फत किंवा ‘थर्ड पार्टी’ (तिसऱ्या पक्षकार) मार्फत खर्च करून या नियमांना बगल देतात,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ही समस्या केवळ भारताचीच नसून जागतिक स्तरावरील असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तिसऱ्या पक्षाच्या अहवालांवर विश्वास ठेवण्यास नकार

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, निवडणुकीत होणाऱ्या खर्चाबाबतच्या तिसऱ्या पक्षाच्या किंवा खासगी संस्थांच्या अहवालांवर न्यायालय पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही, कारण निवडणूक आयोगाने अनेकदा अशा अहवालांचे खंडन केले आहे. मात्र, याचिकाकर्ता हे आयआयटी पदवीधर असून त्यांनी दिलेले तांत्रिक आणि व्यावहारिक सुचवलेले ‘मानक संचालन कार्यपद्धती’ मधील बदल विचार करण्यायोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

पुढील सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने ही जनहित याचिका एक ‘निवेदन’ म्हणून स्वीकारण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच, निवडणूक आयोगाने आपल्या सध्याच्या नियमावलीत खर्च रोखण्यासाठी कोणत्या सुधारणा करता येतील, यावर विचार करावा असेही सुचवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर पुढील सहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित पक्षांना दिले असून, त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले

Web Title: Supreme court notice to central government and election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • central goverment
  • Election Commision
  • Supreme Court

संबंधित बातम्या

“खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस
1

“खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला
2

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

केरळनंतर आता ‘या’ राज्याचे बदलणार नाव? भाजप खासदाराने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
3

केरळनंतर आता ‘या’ राज्याचे बदलणार नाव? भाजप खासदाराने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले
4

NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.