Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस

खोट्या तक्रारींमुळे निष्पाप नागरिकांच्या होणाऱ्या छळाची दखल घेत न्यायालयाने प्रशासनाकडून उत्तर मागवले आहे, तर दुसरीकडे न्यायपालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी शिक्षण परिषदेला कडक शब्दांत फटकारले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 05:30 PM
सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस (Photo Credit- X)

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • “खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे आता खैर नाही…”
  • सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना आणि मानवाधिकार आयोगाला नोटीस
  • ‘भारतीय न्याय संहिता’ आणि निर्दोष नागरिकांचे संरक्षण
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज दोन वेगवेगळ्या प्रकरणांत महत्त्वपूर्ण भूमिका घेत केंद्र सरकार, (Central Goverment) राज्य सरकारे आणि ‘एनसीईआरटी’ला (NCERT) धारेवर धरले आहे. खोट्या तक्रारींमुळे निष्पाप नागरिकांच्या होणाऱ्या छळाची दखल घेत न्यायालयाने प्रशासनाकडून उत्तर मागवले आहे, तर दुसरीकडे न्यायपालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी शिक्षण परिषदेला कडक शब्दांत फटकारले आहे.

पोलीस ठाण्यांत ‘सावधानतेचा इशारा’ लावण्याची मागणी

वकील अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, सर्व राज्य सरकारे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला नोटीस बजावली आहे. या याचिकेत एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे: “प्रत्येक पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक संस्थांच्या आवारात अशा प्रकारचे फलक लावण्यात यावेत, ज्यावर स्पष्टपणे नमूद असेल की – जर कोणी खोटी तक्रार, खोटे पुरावे किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास, त्यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

‘भारतीय न्याय संहिता’ आणि निर्दोष नागरिकांचे संरक्षण

या जनहित याचिकेचा मूळ उद्देश स्पष्ट करताना खंडपीठाने नमूद केले की, अनेकदा वैयक्तिक वादातून किंवा आकसापोटी निष्पाप नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जाते. यामुळे त्यांच्या सन्मानाला आणि मानवी हक्कांना तडा जातो. पूर्वीच्या भारतीय दंड संहितेमध्ये (IPC) खोट्या तक्रारींविरुद्ध प्रभावी तरतुदींचा अभाव होता, मात्र नवीन ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) मध्ये अशा गुन्ह्यांसाठी दंडात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत. तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाही आपल्या कृतीचे परिणाम ठाऊक असावेत, जेणेकरून कायद्याचा दुरुपयोग थांबवता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले

NCERT ला सर्वोच्च न्यायालयाचा ‘अवमान’ नोटीस

आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ला कडक शब्दांत सुनावले. इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमात ‘ज्युडिशिअरी करप्शन’ (न्यायपालिकेतील भ्रष्टाचार) नावाचा एक स्वतंत्र धडा जोडण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सुनावणी केली.

विद्यार्थ्यांच्या मनात न्यायपालिकेविषयी संभ्रम

मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले की, “कौन्सिलने अशा प्रकारे न्यायपालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, जे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.” अभ्यासक्रमात अशा विषयाचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या मनात न्यायपालिकेविषयी संभ्रम निर्माण करण्यामागील कारणांचा खुलासा करण्यासाठी न्यायालयाने ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली आहे. इतकेच नव्हे, तर ही कृती न्यायालयाचा अवमान मानत ‘अवमानना नोटीस’ देखील जारी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून प्रतिसादाची प्रतीक्षा

सर्वोच्च न्यायालयाच्या या दोन्ही भूमिकांमुळे प्रशासकीय आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खोट्या तक्रारींच्या संदर्भात सरकार काय पावले उचलणार आणि NCERT आपल्या वादग्रस्त धड्यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे आता कायदेतज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

‘Love jihad’ प्रकरण! हिंदू मुलीने मुस्लिमाशी लग्न केल्याने देशाच्या रचनेचे नुकसान होतय का? चित्रपटावरून सुप्रीम कोर्टाने फटकारले

Web Title: Supreme court notice to the centre states and human rights commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • central goverment
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Justice Yashwant Varma : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच निर्णय
1

Justice Yashwant Varma : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.