Dhananjay Munde Resignation BJP MLA Suresh Dhas Reaction Maharashtra Political News
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यामुळे बीडमधील वातावरण तापले असून अनेक राजकारण्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणामध्ये भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतली आहे. यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवरुन भाजप आमदार सुरेश धस यांनी टीकेची झोड उठवली. तसेच अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप देखील सुरेश धस यांनी केले. मात्र नंतर मुंडे आणि धस यांची भेट झाली. चार तास दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यामुळे टीका केली जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. तसेच सुरेश धस यांना विश्वासघातकी देखील म्हटले होते. यावर आता सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, “माझ्या नेत्याने म्हणजे प्रदेशाध्यक्षाने आदेश दिल्यानंतर मी तेथे जाणे भाग होते. मुंडे यांच्या काही तरी ऑपरेशन झाले होते. म्हणून मी माणूसकीच्या नात्यातून त्यांना भेटायला गेलो. तेथे देखील मी नमते घेणार नाही असे म्हणाल्याचे बावणकुळे यांनी सांगितलेले आहे. तुम्ही माझ्या विश्वासार्हतेबाबत विचारायचे असेल बीड-परळीच्या जनतेला विचारा.. धनंजय देशमुख यांना विचारा त्यांनी जर सांगितले मी विश्वासार्ह नाही तर मी आपण ओपन एअर थिएटर आहे , आका बाका कोणी मला काय करु शकणार नाही. मला आधीही कधी संरक्षण नव्हेत आताही नाही. हे प्रकरण ‘ए पासून झेड’ पर्यंत लढण्याची आपली तयारी आहे,” असा आक्रमक पवित्रा सुरेश धस यांनी घेतला आहे.
पुढे ते म्हणाले की, “श्रीकर परदेशी साहेबांना सांगून मी पोलिस महासंचालक मॅडमना देखील भेटून आलो आहे.कृषी आयुक्तांना पत्र दिले, रस्तोगी साहेबांना देखील पत्र दिले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवले गेले आहे, उद्या शिवजयंतीचा दिन म्हणून थांबलो आहे. आपण नंतर कृषी साहित्याचे दर देखील सांगणार आहोत कशी फसणवूक झाली ते देखील सांगणार आहोत. २० तारखेला सर्व सांगणार आहे. चार अधिकारी कसे बदलेले आहेत. त्यांची नावे काय आहेत. अजित पवार डीपीसीचे ७३ कोटी रुपये बोगस कसे उचलेले तेव्हा शर्मा नावाचे प्रशासकीय अधिकारी होते. आपण परळी नगरपरिषदेचे ऑडिट लावण्याची मागणी केली आहे, ही सर्व माहिती आपण देणार असून दोन दिवस थोडं थांबा,” असा सूचक इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, आतापर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नऊ आरोपी ३०२ मध्ये आत गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणी किती मोठा असो त्यांच्यावर कारवाई करणार असे आश्वासन बीड येथे येऊन दिलेले आहे. कृष्णा आंधळे हे कोकरु फरार आहे ते सापडेल असेही भाजपा आमदार सुरेस धस यांनी यावेळी सांगितले.