Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला मारहाण झाली नाही’ सुषमा अंधारेंनी आप्पासाहेब जाधवांनाचं तोंडघशी पाडलं, नेमकं काय गौडबंगाल आहे?

आप्पासाहेब यांच्या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी रात्रीच ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत एक फेसबुक लाईव्ह करत आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2023 | 12:18 PM
‘मला मारहाण झाली नाही’ सुषमा अंधारेंनी आप्पासाहेब जाधवांनाचं तोंडघशी पाडलं, नेमकं काय गौडबंगाल आहे?
Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीडमधील ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) आणि उपनेत्या सुषमा अंधारे ((Sushma Andhare ) यांच्यातील वादाने सध्या राज्याच्या राजकारणाचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकीकडे आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळुन लावला. ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रकरण तापतानाच आप्पासाहेब जाधव यांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि यावर सुषमा अंधारेनी काय स्पष्टीकरण दिलं जाणून घ्या.

नेमकं प्रकरण काय?

आज बीडमध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल बिडमध्ये सायंकाळच्या सुमारास सुषमा अंधारे यांच्यासह  जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव हे सभास्थळाची पाहणी करत होते. यावेळी यावेळी इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये भांडणं झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यानंतर आप्पासाहेब जाधवही यांनी अंधारे यांना चापट लगावल्याचा दावा केला होता. त्यानंतर सगळीकडे चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, या प्रकरणी कारवाई करतलगेच पक्षाने जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सुषमा अंधारेचं काय म्हणणं?

आप्पासाहेब यांच्या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी रात्रीच ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत एक फेसबुक लाईव्ह करत आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं.  त्या म्हणाल्या की,  माझ्यावर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. पण मी सुखरुप आहे. मला मारहाण करण्यात आलेली नाही. पुढे त्या म्हणाल्या की,  आम्ही गुरुवारी महाप्रबोधन यात्रा होत असलेल्या माने कॉम्प्लेक्स येथे सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत होते. त्यावेळी बाहेर आप्पासाहेब जाधवांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. एका माणसाला काहीतरी काम सांगत होते. ते त्याला काहीतरी सूचना देत होते. मात्र, त्यांची भाषा उर्मटपणाची आणि एकेरी होती. त्या माणसाला आप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुख असल्याचे माहिती नव्हते. त्याला आप्पासाहेब जाधव यांनी वापरलेली भाषा सहन झाली नाही. तो उलटून आप्पासाहेब जाधव यांना म्हणाला की, तू नीट बोल, मी काही कामगार नाही. त्यावर आप्पासाहेब जाधव यांचा संतापले. मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी नीट बोल, असे म्हणत आप्पासाहेब जाधव यांनी त्या व्यक्तीला म्हण्टलं. मात्र, तेव्हा उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर मध्यस्थी केली मात्र, . आप्पासाहेब जाधव त्यांच्यावरही संतापले. हे सगळे भांडण सुरु असल्याचे समजल्यानंतर मी इतर पदाधिकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आप्पासाहेब जाधव निघून गेले होते. यानंतर उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर संतापले. माझा मित्र शेड्युल कास्टचा आहे, मला पोलिसांमध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायची आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला. पण आपली सभा आहे, महाप्रबोधन यात्रा पार पडू दे, त्यानंतर शांतपणे या सगळ्याचा विचार करू, असे सांगत मी वरेकर यांनी समजूत काढल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

Web Title: Sushma andhare clarification on appasaheb jadhav claimed of he beaten up her nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2023 | 12:16 PM

Topics:  

  • shivsena
  • sushma andhare
  • Udhhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
3

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक
4

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.