Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने रचला इतिहास;घारापुरी ते करंजा जेट्टी प्रवास विक्रमी वेळेत केला पूर्ण

उरण तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र, प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे (वय ११)याने आज नवीन इतिहास रचला. त्याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी १८ किलोमीटर अंतर प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 03, 2024 | 08:45 PM
११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने रचला  इतिहास;घारापुरी ते करंजा जेट्टी प्रवास विक्रमी वेळेत केला पूर्ण
Follow Us
Close
Follow Us:

उरण तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र, प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे (वय ११)याने मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १:०४ मिनिटाने प्रसिद्ध घारापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान देत रात्रभर सतत पोहत सकाळी ७ वाजण्याच्या अगोदरच करंजा जेट्टी येथे पोहोचला. उरण तालुक्यातील घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी १८ किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत पुन्हा एकदा नवा इतिहास घडवीला आहे.गेल्यावर्षी मयंकने ३ डिसेंबर २०२३ रोजी धरमतर ते करंजा जेट्टी हा प्रवाह (चॅनेल )पोहून पार केला. तेव्हाही त्याने विक्रम केला होता. आता घारापुरी ते करंजा हा प्रवाह (चॅनेल )पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिला जलतरण पटू आहे. धरमतर ते करंजा जेट्टी पोहून जाणारा व घारापुरी ते करंजा जेट्टी पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिलाच व एकमेव जलतरणपटू आहे. हे दोन्ही प्रवाह (चॅनेल )सर्वप्रथम पोहण्याचे नवीन विक्रम मयंक म्हात्रे याच्या नावावर आहेत. त्यामुळे मयंक म्हात्रे याचे नाव या चॅनेल वर प्रथम जलतरण पटू म्हणून कायमचे कोरले गेले आहे.

५-५ तास तो पोहण्याचा सराव

११ वर्षीय मयंक म्हात्रे हा सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण येथे शिकत असून कोंढरीपाडा करंजा येथे तो वास्तव्यास आहे. दररोज ५-५ तास तो पोहण्याचा सराव करत असे. त्यातून सर्वांच्या मार्गदर्शनामुळे ३ डिसेंबर २०२४ रोजी उरण तालुक्यातील घारापुरी ते करंजा जेट्टी हा समूद्रातील प्रवाह( चॅनेल )पोहून त्यांनी नवा विक्रम केला आहे.

अनेक विक्रम

घारापुरी ते करंजा हे अंतर सहा तासाच्या आत पूर्ण अपेक्षित होते मात्र मयंकने ते अंतर पाच तास २९ मिनिटात पूर्ण केले. गेल्यावर्षी धरमतर तर ते करंजा जेट्टी कमी वेळेत व कमी वयातील जलतरणपटू म्हणून पोहण्याचा विक्रम केला तसेच ३ डिसेंबर २०२४ रोजी घारापुरी ते करंजा जेट्टी कमी वेळेत, कमी वयात पूर्ण केल्याचे दोन्ही रेकॉर्ड मयंक म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या दोन्ही मार्गावर पोहणारा तो सर्वप्रथम जलतरणपटू ठरला आहे. इतिहासात याची कायमची नोंद होणार आहे.

ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत

मयंक म्हात्रे करंजा जेट्टी येथे सकाळी पोहोचताच करंजाचे ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी त्याचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले.करंजा जेट्टी येथे मयंक म्हात्रे याचा छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी
शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रितम म्हात्रे,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला उरण तालुका अध्यक्ष सीमा घरत,सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर,महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राजीव कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, एडवोकेट सागर कडू, प्राध्यापक एल बी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सीताराम नाखवा, चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश थळी,नितीन कोळी, हेमलता पाटील, संजय ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव

मयंक म्हात्रे याला सुरवातीपासून त्याचे आई वीणा दिनेश म्हात्रे व वडील दिनेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. मयंकच्या या ऐतिहासिक कामगिरीस प्रशिक्षक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनिल पाटील, प्रशिक्षक मनोहर टेमकर, जलतरण पटू आर्यन मोडखरकर, जयदीप सिंग, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील आदींचे सहकार्य या विक्रमा दरम्यान लाभले आहे. मयंक म्हात्रे याच्या आजपर्यंतच्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड स्पर्धेसाठी सेंटमेरी स्कुलच्या माध्यमातून राज्यस्तरावर झाली आहे.उरण नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा, मुंबई जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे वर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Swimmer mayank mhatre completed the journey from gharapuri to karanja jetty in record time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
1

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक
2

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
3

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.