Taraporewala Aquarium to be modernized, a joint initiative of Tourism and Fisheries Department
मुंबई : तारापोरवाला जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. राज्यामध्ये सध्या विधीमंमडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये राज्यातील अनेक विकासकामांना आणि प्रकल्पांना चालना दिली जात आहे. यामध्ये तारापोरवाला येथील मत्सालयाचा देखील समावेश आहे.
विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपयोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते. यावेळी भाजप नेते व आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आगामी फिल्मफेअर सोहळा वेंगुर्त्यात करा तसेच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पर्यटन वाढीला मदत होणार आहे, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊसला खाजगी भागीदार (पीपीपी) यांचा समावेश करून चालविण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात यावा. एका गेस्ट हाऊस वर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावे, अशी मागणी राणे यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष अनुदान देऊन विकास करण्यात यावा, असेही राणे यांनी सांगितले. आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी राणे यांनी पर्यटन विभागाकडे केले असून पर्यटन मंत्री यांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तात्काळ नेमणूक
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “तारापोरवाला येथील मत्स्यालय मुंबईचे आकर्षण होते. त्यामुळे याला आधुनिक स्वरूप दिल्यास पर्यटन वाढीस मदत होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाह्य यंत्रणेद्वारे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेले समुद्र किनाऱ्यावर शौचालय, लाईफ गार्ड ची सुविधा देण्यात यावी,” असे स्पष्ट मत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडले आहे.