धुलिवंदनमुळे पुणे मेट्रो सेवा राहणार बंद (फोटो सौजन्य - istock )
पुणे : राज्यासह देशभरामध्ये होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये देखील हा उत्साह दिसून येत आहे. पुणेकरांसाठी मेट्रो सेवेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्यातील मेट्रोसेवा ही सणानिमित्त बंद राहणार आहे. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.
पुण्यातील अंतर्गत सेवेमध्ये पीएमपीएमएल बससेवेबरोबरच मेट्रो देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मेट्रो सेवा अंतर्गत वाहतूकीमध्ये मोठी दिलासादायक ठरत आहे. शहरातील वाहतूक कोंडी यामुळे कमी झाली असून प्रदूषणावर देखील नियंत्रण आणण्यास मदत होत आहे. दररोज लाखो प्रवासी पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेत आहेत. नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सेवा सुखकर ठरत आहे. पण सध्या धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज (दि.13) होळीचा सण आहे. तर उद्या धुलिवंदन (दि.14) साजरे केले जाणार आहे. यामुळे धुलिवंदनच्या दिवशी पुणे मेट्रो बंद राहणार आहे. राज्यात आज होळी साजरी होत आहे. यानिमित्ताने पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. उद्या १४ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पुण्यात मेट्रो सेवा बंद राहणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणेकर मेट्रो प्रवाशांसाठी…
धुळवड सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा शुक्रवार, दिनांक १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत बंद असणार आहे. तसेच दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल.#Pune #Metro@metrorailpune
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 12, 2025
जीबीएसविरोधात पुणे पालिका सज्ज
मागील महिन्यापासून गुलेन बॅरे सिंड्रोम च्या (जीबीएस) रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डिएसके विश्व या भागात मागील महिन्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. महापालिकेकडून या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत २ लाख तर ज्यांच्याकडे शहरी गरीब योजनेचे कार्ड नाही त्या रुग्णांना १ लाखाची मदत देण्यात येते. ही मदत २६ जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून आत्तापर्यंत बीएस आजाराने बाधित झालेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २ लाखाची तर मदत देण्यात आली तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या २८ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २८ लाखांची मदत देण्यात आली आहे. सिंहगड रस्ता भागात पुन्हा एकदा ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) चे नवीन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने सिंहगड रस्ता भागातील एकुण ४३ आर ओ प्लांट बंद केले आहेत. या प्लांट चालकांकडून नियमावलीचे पालन न केल्याने त्यांच्याविराेधात ही कारवाई केली आहे.