Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगाव मणेराजुरी रस्त्यावर अपघात;एकाच कुटुंबातील सहा जणांवर काळाचा घाला

तासगाव मणेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या ताकारी कालव्यात अल्टो कार कोसळून अपघात झाला. एकाच कुटुंबातील सहजण ठार झाले.

  • By प्रीति माने
Updated On: May 30, 2024 | 11:06 AM
तासगाव मणेराजुरी रस्त्यावर अपघात;एकाच कुटुंबातील सहा जणांवर काळाचा घाला
Follow Us
Close
Follow Us:
तासगाव : तासगाव मणेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या ताकारी कालव्यात अल्टो कार कोसळून अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबावर शोककळा पसरली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जण जागेवरच ठार झाले. सुदैवाने एक महिला बचावली. हा अपघात बुधवार रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातामध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील ( वय ६०), सुजाता राजेंद्र पाटील ( दोघे रा, तासगाव वय ५५ ) , प्रियंका अवधूत खराडे  (वय ३०) , द्रुवा अवधूत खराडे ( वय ५), कार्तिकी अवधूत खराडे ( तिघे रा,  बुधागाव  वय १ वर्ष), राजवी विकास भोसले ( वय ३ रा, कोकळे ता, कवठेमहांकाळ )  असे सहा जण जागेवरच ठार झाले तर स्वप्नाली विकास भोसले (रा, कोकळे ता, वय २६) या सुदैवाने बचावल्या आहेत. मात्र त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मयत कुटूंब हे बचावलेल्या स्वप्नाली भोसले याची मुलगी राजवी हिचा मंगळवारी वाढ दिवस होता.त्यासाठी सर्व कुटूंब वाढ दिवस साजरा करण्यासाठी स्वप्नाली याच्या सासरी कोकळे येथे एकत्र आले होते.मंगळवारी रात्री वाढ दिवस साजरा करून ,जेवण करून सर्व जण तासगाव येथे येण्यास रात्री उशिराने अल्टो कार ( एम एच १० ए एन १४९७) मधून  येत होते. कार मृत राजेंद्र हे चालवत असताना कार मणेराजुरी रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या ताकरी कालव्याजवळ आली असता राजेंद्र याचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली.
अपघात  रात्री साडे बारा वाजता घडला असल्याने  बचावलेल्या स्वप्नांली यांनी मदतीसाठी आरडा ओरडा करून ही कोणाला येता आले नाही .रात्र असल्याने आणि कार खोल कालव्यात पडल्याने रात्री ये जा करणाऱ्या कोणत्याही वाहन चालकाच्या लक्षात आले नाही. सर्व जण कार मध्ये अडकून पडल्याने जखमींना वेळेत उपचार न मिळल्याने त्याचा जागीच  मृत्यू झाला. सकाळी सहा वाजता मॉर्निग वॉक साठी गेलेले येथील बेदाणा व्यापारी सुदाम शेठ याना स्वप्नाली या मदतीसाठी आरडा ओरड करीत असल्याचे  दिसून आले.सुदाम माळी व त्याचे मित्र आवाजाच्या दिशेने गेले असता कार कालव्यात कोसळली असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अन्य लोकांच्या साहाय्याने जखमी स्वप्नाली याना कार मधून बाहेर काढले. त्यांनी ताताडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले हे आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. त्याच्या पथकाने रेस्क्यू पथकाच्या सहाय्याने सर्व मृतदेह कार व कळाव्या मधून बाहेर काढले.जखमी स्वप्नांली यांना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली असली तरी स्वप्नाली यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सर्व मृतदेहाचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. बुधवारी दुपारी सर्व मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.संबंधितांना तपासाच्या योग्य त्या सूचना केल्या.
राजवीचा वाढदिवस काळ रात्र ठरला….
मृत राजेंद्र पाटील व त्याच्या पत्नी सुजाता याच्यावर तासगाव येथे, प्रियंका खराडे, त्यांच्या दोन्ही मुली द्रुवा व कार्तिकी याच्यावर बुधागाव येथे तर राजवी हिच्यावर कोकळे ता, कवठेमहांकाळ येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. राजवी हिच्या वाढदिवसानिमित सर्व कुटूंब एकत्र आले पण काळाने त्याच्यावर घाला घातला. मृत राजेंद्र पाटील हे अभियंता होते.काही काळ त्यांनी वसंतदादा साखर कारखान्यात जलसिंचन विभागात काम केले होतें .गेल्या काही वर्षांपासून ते शासकीय ठेकेदार म्हणून काम करीत होते. छोटेशे कुटूंब पण सुखवस्तू होते. त्याच्या पश्चात मुलगा विश्वजित हा आहे.तो शिक्षणा निमित्त पुणे येथे असतो.
अपघातग्रस्त कुटूंबाला वेळीच मदत मिळाली असती तर काहींच्या उपचार होऊन अपघातातील जखमीचे प्राण वाचले असते. मात्र पाटील कुटुंबासाठी रात्र वैऱ्याची ठरली. रात्रीची वेळ आणि कार कालव्यात कोसळल्याने घटनेची माहिती कोणाला लवकर समजली नाही. रात्री साडे बारा वाजता घडलेली घटना सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. सहा तास जखमी मदती विना विव्हळत पडले असावे अशी चर्चा घटना स्थळी सुरू होती.

Web Title: Tasgaon manerajuri road accident six people died from the same family accident news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 11:06 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.