बीड : शहरातील नामांकित गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये (Gurukul English School) चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाहेदखान कासम पठाण नावाचा या शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालक संतप्त झाले आणि त्यांनी शाळेत एकच राडा करत शिक्षकावर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या संस्थेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्यील या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर, ‘आम्ही कोणाच्या जबाबदारीवर मुलींना शाळेत पाठवायच? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे लाखों रुपयाची ट्यूशन फीस विद्यार्थ्यांकडून घेणारे संस्थाचालक मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजना बाबतीत मात्र हलगर्जीपणा करत असल्याचे या घटनेत दिसून येत आहे. ज्या चौथीच्या वर्गामध्ये या मुलीवर अत्याचार झाला त्या वर्गखोलीत सिसिटीव्ही नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षण संस्थेवरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
[read_also content=”क्रेशर मशीन, डांबर प्लांटमुळे आरोग्याला धोका, भजेपारवासींचा आंदोलनात्मक पवित्रा, दिले तहसीलदारांना निवेदन https://www.navarashtra.com/maharashtra/crusher-machine-threat-to-health-due-to-asphalt-plant-agitating-holy-of-bhajepar-residents-nraa-266894.html”]
[read_also content=”धार्मिक संघटनांच्या नावावर सुरु आहेत अवैध धंदे, लाकूड आणि जनावरांच्या तस्करीसह गिट्टीकडे देखील वक्रदृष्टी https://www.navarashtra.com/maharashtra/illegal-trades-in-the-name-of-religious-organizations-smuggling-of-timber-and-animals-nraa-266877.html”]