Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांची उन्हाळी सुट्टी विद्यार्थ्यांच्या शोधासाठी; पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरुच

शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांना दारोदारी फिरण्याची वेळच येणार नाही. पालकही स्वतः हून पुढाकार घेत आपल्या पाल्याचा प्रवेश उत्कृष्ट शाळेत करतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2025 | 01:38 PM
होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, तीव्र उष्णताही जाणवत आहे. अशातच शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना मोठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. उन्हाळ्याची सुट्टी शिक्षकांनी आता विद्यार्थी मिळविण्यासाठी खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे.

शहरी भागातील शिक्षक ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या पाल्याने आपल्याच शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांची मनधरणी करत आहेत. तर पालक ‘हो, पुढे पाहू, नंतर सांगतो’, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा दाखला हातात पडला तर शिक्षकांचा आनंद द्विगुणित होतो, नाही मिळाला तर निराशा पदरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील शाळांचे निकाल नुकतेच विद्यार्थ्यांच्या हाती आले. यामुळे माध्यमिक शाळांच्या शिक्षकांची आता आपल्या शाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी विद्यार्थी शोध मोहीम सुरू केली आहे. विनाअनुदानित शाळांची संख्या झपाट्याने वाढल्याने तसेच गावोगावी शाळांचे पेव फुटल्याने विद्यार्थी प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे.

शासनाच्या पट पडताळणीमुळे शिक्षकवर्ग कोंडीत

शासनाने केलेल्या पट पडताळणीमुळे तर शिक्षकवर्ग मोठ्या कोंडीत सापडलेला आहे. वास्तविक, पाहता शालेय नियमानुसार एक तुकडीसाठी 30 विद्यार्थ्यांची पटसंख्या तर विद्यार्थी प्रवेशासाठी शाळेतर्फे विविध प्रलोभने पालकांना दिली जात आहे.

नोकरी टिकवण्याची गुरुजींची धडपड

मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद असून, अनेक उच्चशिक्षित उमेदवार रिकामटेकडे आहेत. त्यांना अजूनही रोजगार न मिळाल्याने संधीची प्रतीक्षा आहे. तर काही शिक्षक कसे बसे नोकरीवर लागले आहेत. मात्र, एकीकडे विद्यार्थ्यांची पटसंख्याच नसेल तर आपल्या नोकरीचे काय? हा त्यांच्यासमोर प्रश्नच आहे.

शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी

शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांना दारोदारी फिरण्याची वेळच येणार नाही. पालकही स्वतः हून पुढाकार घेत आपल्या पाल्याचा प्रवेश उत्कृष्ट शाळेत करतील. मात्र, शाळा व्यवस्थापन शाळा सुधारणेकडे लक्ष न देता केवळ शाळेची तुकडी टिकावी याकडेच लक्ष देत आहे.

Web Title: Teachers are trying to increase number of student

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

ना वाहतूक व्यवस्था, ना पक्का रस्ता ‘इथं’ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून काढावा लागतोय मार्ग
1

ना वाहतूक व्यवस्था, ना पक्का रस्ता ‘इथं’ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून काढावा लागतोय मार्ग

तब्बल 30 वर्षांनी शाळांच्या रचनेत केला गेला मोठा बदल; आता केंद्रप्रमुख होणार ‘समन्वयक’
2

तब्बल 30 वर्षांनी शाळांच्या रचनेत केला गेला मोठा बदल; आता केंद्रप्रमुख होणार ‘समन्वयक’

गारगोटीची ‘ही’ शाळा ठरली राज्यातील ‘पहिली ई-डॉक्युमेंट’ शाळा; दाखले, बोनाफाईड मिळणार ऑनलाईन
3

गारगोटीची ‘ही’ शाळा ठरली राज्यातील ‘पहिली ई-डॉक्युमेंट’ शाळा; दाखले, बोनाफाईड मिळणार ऑनलाईन

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
4

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.