Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंडनमध्ये साकारले जाणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव्य मंदिर; 22 देशांतून कारने केला जाणार प्रवास

खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे 22 देशांतून 18000 किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2025 | 10:53 AM
लंडनमध्ये साकारले जाणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव्य मंदिर; 22 देशांतून कारने केला जाणार प्रवास

लंडनमध्ये साकारले जाणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव्य मंदिर; 22 देशांतून कारने केला जाणार प्रवास

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मूळ गाव अहिल्यानगर असून, सध्या लंडन येथे स्थायिक आहेत. ते लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्ताने पादुकासह दिंडी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांच्याकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून, काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव्य मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत.

यानिमित्ताने 14 एप्रिल ते 21 जून 2025 दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन प्रयत्नशील आहे. याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, ‘मी गेल्या 7 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. अमेरिका, यूरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत. पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही, यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे’.

तसेच मी वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे असे ते म्हणाले. खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे 22 देशांतून 18000 किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार आहे. भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचणार आहे. त्यासाठी सर्व देशांचा व्हिसा, वाहनांचे परमिट व इतर अनुषंगिक कायदेशीर तयारी त्यांनी केली आहे.

सोमवारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून दिंडी मार्गस्थ

सोमवारी (दि.14) श्रीक्षेत्र पंढरपूर येथून दिंडी मार्गस्थ झाली आहे. 18 एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा 22 देशांतून 70 दिवसात 18 हजार किमी एवढा प्रवास करत कारने या पादुका घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

Web Title: Temple of shri vitthal rukmini mata will be built in london

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • pandharpur temple
  • Shri Vitthal Rukmini Mata
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.