खंडाळा बसस्थानकात अपघात
तुळजापूर : देवदर्शनासाठी तुळजापूर शिखर शिंगणापूरकडे निघालेल्या गिर कुटुंबावर काळाने घाला घातला. काक्रंबा-वडगाव लाख रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री अडीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. तर यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील गीर कुटुंब टमटममधून शिखर शिंगणापूरला जाताना तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वडगाव लाखजवळ चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सिमेंट पुलाला पुलाला धडकली. अपघातात अवधूत अमोल गीर (वय ४) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अमोल नरोत्तम गीर, दुर्गा अमोल गीर, जयश्री नरोत्तम गीर, वैष्णव हणुमंत पुरी, गीतांजली नरोत्तम गीर (वय ३२), अद्विक अमोल गीर (वय २) व नरोत्तम प्रेम गीर (वय ६२) हे सर्वजण जखमी झाले आहेत.
डॉक्टर, नागरिकांची मदत
घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिका चालक जहीद पटेल आणि डॉ. राऊत यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी सर्वांना धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून मृत बालकाचा मृतदेह तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : काळजी घ्या ! देशभरात कोरोनाचा वाढतोय धोका; गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू तर रुग्णसंख्या पोहोचली…
कलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अपघात
दुसऱ्या एका घटनेत, शहादा-प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अपघात झाला. भरधाव डंपर आणि कार या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरने दिलेल्या धडकेत कार थेट रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन पलटी झाली. दरम्यान, अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.