मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश
मुंबई: केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका सभेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. “एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने मला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी त्या नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला सर्व दिले आहे ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. कोणतीही ऑफर मला मोहात पाडू शकत नाही’, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांच्या या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट प्रतिक्रीया दिली आहे. “नितीन गडकरीजी खुर्चीवर बसण्याची मनापासून इच्छा व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षांच्या नावाने ते पंतप्रधान मोदींना वेगळाच संदेश देत आहेत. पण इंडिया आघाडीकडे देशाचे नेतृत्व कऱण्यासाठी खूप सक्षम नेते आहे. त्यामुळे भाजपकडून कोणताही नेता उधार घेण्याची आमची इच्छानाही, खूप छान खेळलात नितीन जी!” अशी प्रतिक्रीया प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली आहे.
हेही वाचा: ‘विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून मला पंतप्रधानपदाची होती ऑफर’; नितीन गडकरी यांचा मोठा दावा
पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने मला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी त्या नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला सर्व दिले आहे ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. कोणतीही ऑफर मला मोहात पाडू शकत नाही’. मात्र, गडकरींनी त्या विरोधी पक्षनेत्याचे नाव किंवा पक्षाची ओळख उघड केले नाही.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी असे मानले जात होते की भाजप पूर्ण बहुमत मिळवू शकणार नाही. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता पडेल. मी त्यांना स्पष्ट सांगितले की मी काही तत्त्वे व विश्वासांसह वाढलो, त्यांच्याशी तडजोड करणार नाही.
हेही वाचा: देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरात भूमिपुत्रांना काय मिळणार?