Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

ठाण्यातील स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, युवक, महिला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वोत्तम बनवण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी ठाण्यातील विविध विकास प्रकल्प आणि योजनांची माहिती देण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 15, 2026 | 09:43 PM
‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Follow Us
Follow Us:
  • सक्षम शेतकरी, युवक आणि महिला हीच विकासाची खरी व्याख्या : एकनाथ शिंदे
  • ठाणे मेट्रो, दुहेरी बोगदा आणि ९०० खाटांच्या सिव्हिल हॉस्पिटलला गती
  • ६ हजारांहून अधिक AI कॅमेऱ्यांनी ठाणे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मजबूत
 

ठाणे : सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच विकासाची खरी व्याख्या असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांची ताकद आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडून महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असल्याचे सांगत शिंदे यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा उल्लेख केला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’सह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

ठाणे जिल्ह्यात ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंदणी केली आहे. आधुनिक शेती साहित्य, सिंचन साधने आणि महिला बचतगटांना ई-कार्टचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ठाण्याच्या विकासाला नवी गती

ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा हे प्रकल्प शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे शिंदे म्हणाले. ठाणे आणि अंबरनाथमधील मलनिःसारण प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील ९०० खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षी सेवेत आणण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

AI कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६ हजार ५९ AI-सक्षम कॅमेरे बसवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ आणि नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप सुरू करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ नष्ट केल्याची माहितीही त्यांनी दिली.

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

‘जेन झी’ ही देशाची सुपरपॉवर

आजची जेन झी पिढी तंत्रज्ञानस्नेही आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी असल्याचे सांगत शिंदे यांनी युवकांना स्टार्टअप, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि AIच्या माध्यमातून विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धे’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. तसेच महिला सक्षमीकरण आणि यशकथांवर आधारित ‘स्त्री दर्पण’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Thane independence day eknath shinde farmers youth women development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Independence Day 2026

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.