Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझे घर, माझा गणपती’ संकल्पनेतून ठाणे महापालिकेची शाडू मूर्ती कार्यशाळा, ३००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण. याच सणानिमित्त ठाणे महापालिका एक विशेष उपक्रम राबवत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 30, 2025 | 07:35 PM
'माझे घर, माझा गणपती' संकल्पनेतून ठाणे महापालिकेची शाडू मूर्ती कार्यशाळा, ३००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

'माझे घर, माझा गणपती' संकल्पनेतून ठाणे महापालिकेची शाडू मूर्ती कार्यशाळा, ३००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझे घर, माझा गणपती’ या संकल्पनेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे. या उपक्रमाला पर्यावरण दक्षता मंडळ व इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. नागरिकांसाठी या कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

दि. १४ जूनपासून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सुरू झालेल्या ग्रीन शॉपी कार्यालयातील कार्यशाळेत आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी कार्यशाळांची ठिकाणे व संख्याही वाढविण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता मंडपासाठी खड्डा खणल्यास…; मंत्री लोढा यांची स्पष्ट भूमिका

कार्यशाळांची ठिकाणे व वेळापत्रक

दादोजी कोंडदेव स्टेडियम, गाळा क्र. १५ – येथे १७ ऑगस्टपर्यंत दररोज कार्यशाळा आयोजित केली जात आहे.

उपवन तलाव ॲम्फी थिएटर – येथे १७ ऑगस्टपर्यंत दर शनिवार आणि रविवार कार्यशाळा होईल.

शिवशाहूफुलेआंबेडकर स्मृती सभागृह, पोखरण रोड नं. २ – येथे २ व ३ ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित.

या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी ९९२०७७२८६९ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवता येईल.

KDMC News : न्यायासाठी शांतीदूत सोसायटीचे सभासद पुन्हा बसणार उपोषणाला; माजी आमदार नरेंद्र पवारही होणार सहभागी

विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम:

महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण शाळा’ उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात ठाणे महापालिकेच्या हद्दीतील ३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृतीही करण्यात आली. ठाणे शहरासह डायघर, खर्डी, दिवा, मुंब्रा, बाळकुम, मानपाडा, ओवळा परिसरातील शाळांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

मूर्तीकारांसाठी महापालिकेचे सहकार्य:

महानगरपालिकेने ४ मूर्तीकारांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, १७ मूर्तीकारांना सुमारे २५ टन शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मूर्तीकारांना आर्थिक दिलासा मिळत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

या उपक्रमाद्वारे ठाणे महापालिकेचा उद्देश नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत सुरक्षित आणि हरित गणेशोत्सव साजरा करण्याकडे वाटचाल करण्याचा आहे.

 

Web Title: Thane municipal corporations shadu idol workshop with the concept of my home my ganapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • ganeshotsav 2025
  • Thane Municipal Corporation
  • Thane news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.