Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : “शाडू मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक, पण खाडीत विसर्जन धोकादायक” काय सांगतायत पर्यावरणतज्ज्ञ ?

सर्वसामान्य म्हटलं जातं की, शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक असते. मात्र हीच शाडूची मूर्ती खाडीत विसर्जित केली तर काय होतं याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जाणून घ्या सविस्तर...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 08, 2025 | 04:01 PM
Thane News : “शाडू मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक, पण खाडीत विसर्जन धोकादायक” काय सांगतायत पर्यावरणतज्ज्ञ ?
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : गणेशाच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी घरी येणाऱ्या गणपती बप्पाची मुर्ती ही पर्यावरण पूरक म्हणजेच शाडूच्या मातीची असावी असं सांगण्यात येतं. अनेकजण शाडूच्या मातीची मूर्तीचं विसर्जन हे खाडी, नदी आणि समुद्रात करतात. सर्वसामान्य असं म्हटलं जातं की, शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक असते, म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही. मात्र हा गैरसमज आहे. वास्तविक पाहता, शाडू माती देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली, तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीने POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींना विरोध होतो, हे योग्यच. मात्र त्याचवेळी शाडू मातीच्या नावाखाली खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्यास जलप्रवाहावर, मत्स्यसंपदेवर आणि समुद्री जैवसाखळीवर नकारात्मक परिणाम होतो, हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

शाडू माती ही जरी नैसर्गिक असली, तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकणमाती असते. जेव्हा ती खाडीत मिसळते, तेव्हा त्या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्यानं होत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो, पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचं नैसर्गिक अधिवास बाधित होतो. याशिवाय मूर्तींसोबत टाकले जाणारे रंग, हार, कापड, थर्मोकोल, प्लास्टिक हे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले.

“शाडू माती म्हणजे पर्यावरणपूरक आहे हे खरं आहे पण ती खाडीत या मूर्तीचं विसर्जन केलं तर खाजीच्या पाण्याचं नुकसान होतं. नैसर्गिक वस्तूंचा गैरवापर झाला, तर त्याचा परिणाम तितकाच घातक ठरतो.” असं मत पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारने ठाणे खाडीला “रामसर” स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे खाडीत प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाचेच आद्य कर्तव्य आहे. प्रशासन वारंवार कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन करतं आहे. घरगुती विसर्जन, टाकाऊ मातीचा पुनर्वापर, जलकुंड, आणि ‘घरातच विसर्जन’ हे पर्याय उपलब्ध असताना खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचं कुठलंच पर्यावरणीय कारण उरत नाही, असं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितलं आहे.

गणेशोत्सव हा उत्सव निसर्गाशी सुसंवादी राहिला, तरच त्याचा खरा अर्थ साध्य होईल. त्यामुळे ‘शाडू माती’चा वापर करा, पण मूर्तीचं   ‘खाडीत विसर्जन’ नको. पर्यावरणस्नेही होणं ही फक्त वितार नाही तर  ती कृतीत उतरवायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ठाणे खाडी वाचली तर तिथली जैवसाखळी उत्तम राहील, याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितलं आहे.

 

Web Title: Thane news ganesh idols made of clay are environmentally friendly but immersion in the creek is dangerous says environmentalist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
1

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
2

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
3

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
4

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.