Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उल्हासनगरमध्ये बिस्कीट कंपनीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारमध्ये एका बिस्कीट कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही, तसेच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2024 | 12:29 PM
उल्हासनगरमध्ये बिस्कीट कंपनीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (फोटो सौजन्य-X )

उल्हासनगरमध्ये बिस्कीट कंपनीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील उल्हासनगर कॅम्प 4 मधील बिस्किट उत्पादन करणाऱ्या दलसन फूड कंपनीला आज (9 सप्टेंबर) आग लागली. गावदेवी मंदिराजवळील ए/9 औद्योगिक परिसरात कंपनीच्या सुविधेमध्ये ही घटना घडली. दलसान फूड कंपनीत ही आग लागली असून आगीत कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे यांनी सांगितले की, ही आग सकाळी 8.15 च्या सुमारास लागली. आगीच्या घटनेदरम्यान आपत्कालीन सेवांनी तातडीने प्रतिसाद दिला. यानंतर तीन अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 10.15 पर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विद्युत यंत्रणेतील शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. या घटनेमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कारखाना आणि त्यातील उपकरणांचे किती नुकसान झाले याचे मूल्यांकन केले जात आहे. शॉर्ट सर्किटचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि आगीच्या एकूण आर्थिक परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सखोल तपास करणे अपेक्षित आहे.

Fire broke out at Dalson Food Company, a biscuit manufacturing unit located in Ulhasnagar Camp 4. Authorities told the fire was caused by short circuit in the electrical system. While the incident resulted in substantial financial losses for the company, there were no casualties. pic.twitter.com/QNxSqrezdQ

— Nirmeeti Patole (@NirmeetiP) September 9, 2024

आगीचे सत्र सुरुच…

दोन दिवसापूर्वी मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल परिसरात असलेल्या टाइम्स टॉवरला भीषण आग लागली. ही घटना 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6.29 वाजता घडली. अग्निशमन दलाने तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी 9 गाड्या आणि जवान तैनात केले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

तसेच कमला मिल परिसरात काही वर्षांपूर्वीही अशीच भीषण आग लागली होती, त्यामुळे येथे आगीची ही घटना पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करते. 29 डिसेंबर 2017 रोजी, सकाळी 12.30 च्या सुमारास आग लागली आणि नंतर कमला मिल्स कंपाऊंडमधील मोजोज बिस्ट्रो रेस्टॉरंटमध्ये पसरली यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते.

Web Title: A fire broke at a biscuit company in ulhasnagar fire brigade reached

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • Biscuit
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगर-अंबरनाथमध्ये सव्वा कोटींचं  शिवलिंग
1

Ulhasnagar : उल्हासनगर-अंबरनाथमध्ये सव्वा कोटींचं शिवलिंग

Ulhasnagar : किरकोळ वादाचे हिंसक रुपांतर, गंगियादेवी साहूंवर कुटुंबियांचा हल्ला
2

Ulhasnagar : किरकोळ वादाचे हिंसक रुपांतर, गंगियादेवी साहूंवर कुटुंबियांचा हल्ला

उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, मुख्य आरोपी अटक
3

उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, मुख्य आरोपी अटक

Ulhasnagar Crime : जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्…. ; अंगावर काटा आणणारा आत्महत्येचा थरार
4

Ulhasnagar Crime : जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्…. ; अंगावर काटा आणणारा आत्महत्येचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.