Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका

Thane News: ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जांभूळ गावाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. रासायनिक सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, प्रशासनाकडे तातडीने पाणी आणि माशांचे नमुने तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 13, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • उल्हास नदीपात्रात जांभूळ गावाजवळ मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळल्याने खळबळ उडाली.
  • प्रदूषित पाण्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
  • मृत माशांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

 

उल्हास नदीपात्रात जांभूळ गावाजवळ मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे हा भयंकर प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत असून, या जलप्रदूषणामुळे केवळ आदिवासी बांधवांच्या मासेमारीवरच गदा आली नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाची असलेली उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीत मासेमारी करून उदरनिवांह करणाऱ्या आदिवासी बांधवांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसतो आहे. मंगळवारी स्थानिक मच्छिमार सुनील मुकणे हे जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत मासेमारीसाठी गेले असता, त्यांना नदीकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने मासे मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ यांना या परिस्थितीची माहिती दिली.

Kalyan News : हॉर्न वाजवल्याचा राग अनावर; तरुणाला बेदम मारहाण, तक्रार मागे घेण्यासाठी मामालाही चोप

उल्हास नदीत औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक सांडपाणी आणि आजूबाजूच्या शहरांमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी राजरोसपणे सोडले जात असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे. या प्रदूषित पाण्यामुळेच पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावून माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

KDMC News: महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रशासनाने माशांचे नमुने तपासण्याची मागणी

या प्रकरणी केवळ पंचनामे करून किंवा आश्वासने देऊन प्रशासनाने थांबू नये, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने घटनास्थळी यून पाण्याचे आणि मृत माशांचे नमुने तपासावेत, अशी मागणी सरपंच परीक्षित पिसाळ यांनी केली आहे. तसेच, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांची तातडीची संयुक्त बैठक बोलावून कारवाईचे निर्देश द्यावेत, नदीत सोडल्या जाणाऱ्या नाल्यांची तपासणी करावी आणि राज्याच्या पर्यावरण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रासायनिक पाणी सोडणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी

नदीत रासायनिक सांडपाणी सोडणारे उद्योग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि मृत माशांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी, असेही त्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे. नदीकिनाऱ्यावर मृतावस्थेत पडलेले मासे नागरिकांनी अजिबात उचलू नयेत, ते खाऊ नयेत अथवा त्यांची विक्री करू नये, असे जाहीर आवाहन केले जाते आहे. विषारी पाण्यामुळे मासे मृत झाल्याची शक्यता असल्याने लहान मुलांना नदीकिनारी जाण्यापासून रोखावे आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हास नदीत मृत मासे कुठे आढळले?

    Ans: ठाणे जिल्ह्यातील जांभूळ गावाजवळ उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळले.

  • Que: उल्हास नदीत माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा?

    Ans: नदीत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: नदीतील मृत मासे नागरिकांनी खावेत का?

    Ans: नाही. मृत्यूचे कारण स्पष्ट होईपर्यंत नागरिकांनी मृत मासे उचलू नयेत, खाऊ नयेत किंवा त्यांची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Thane news ulhas river pollution dead fish found near jambhul village thane pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Kalyan News : दहा तासांच्या संघर्षानंतर अखेर दफनविधी; केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला
1

Kalyan News : दहा तासांच्या संघर्षानंतर अखेर दफनविधी; केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला

Diva News: दिव्यातील डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग; विषारी धुरामुळे दिवेकरांच्या आरोग्याला धोका!
2

Diva News: दिव्यातील डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग; विषारी धुरामुळे दिवेकरांच्या आरोग्याला धोका!

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
3

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू
4

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.