Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; तत्कालीन आयुक्तांची होणार सखोल चौकशी?

ठाणे महानगरपालिकेतील भोंगळ कारभाराबाबत सखोल चौकशी व्हावी याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2025 | 03:47 PM
ठाणे महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; तत्कालीन आयुक्तांची होणार सखोल चौकशी?

ठाणे महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; तत्कालीन आयुक्तांची होणार सखोल चौकशी?

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून लेखा परिक्षण न झाल्यामुळे 337 कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून, महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची माहिती उपलब्ध नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लेखा परीक्षण न झाल्याबद्दल राज्य सरकारने महापालिकेला विचारणा करावी. तसंच 337कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठाणे महापालिकेचा 2025-26 चा 5 हजार 645 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी मांडला असून, यंदा अर्थसंकल्पात 600कोटींची वाढ झाली. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असतानाच, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. आता लेखा परीक्षण टाळून भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा नवा उद्योग सुरू झाला आहे, असा आरोप देखील माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.

Thane: साहसी खेळ, भव्य मिरवणूक ; ठाण्यात शिवजयंतीचा उत्सव शिगेला

दरवर्षी महापालिकेचे नियमानुसार लेखा परीक्षण होणे आवश्यक आहे. परंतु, 2019-20 पर्यंतच महापालिकेचे लेखा परीक्षण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकारकडून विविध कामांसाठी प्राप्त निधी व अनुदान आणि कोरोना आपत्तीच्या काळातील अर्थसाह्याची माहिती उपलब्ध नसून, 337 कोटी रुपयांचा हिशोब लागलेला नाही, याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन, ठाणे महापालिकेच्या पाच वर्षांत न झालेल्या लेखा परिक्षण प्रकरणी चौकशी समिती नेमावी. तसंच 337 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणाबरोबरच लेखा परीक्षण न झालेल्या वर्षी कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे.

Sanjay Raut News: ‘हिंमत असेल तर करून दाखवा…’; औरंगजेबाच्या कबरीवरून संजय राऊतांचे खुले आव्हान

महापालिका भ्रष्टाचाराचे `कुरण’!

ठाणे महापालिका प्रशासनाचा अंदाधुंद कारभार व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे लेखा परीक्षण झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक फुटकळ कामांच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केली. त्यातून जनतेच्या कररुपी पैशांची लूट झाली. महापालिकेतील काही `मस्तवाल’ अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून, महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे, असा आरोप माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.

Web Title: Anand paranjape has demanded a thorough investigation into the corruption worth crores in the thane municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Anand Paranjape
  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
2

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त
4

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.