10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर (फोटो सौजन्य-X)
Dahi Handi 2025 News In Marathi : गोविंदांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शनिवारी सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथके दाखल झाली आहेत. यापैकी कोकणनगर गोविंदा पथकाने वर्तकनगर येथील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात दहा थर लावून विश्वविक्रम केला. या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून वर्तकनगरच्या मैदानावर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी मंडळांकडून लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात.
यावर्षी, पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाख रुपये बक्षीस आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. याशिवाय, जगाला जगप्रसिद्ध करणाऱ्या गोविंदा पथकांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या दहीहंडी उत्सवात 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी, आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले आहे.
यंदा बॉलीवूडच्या शोले चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने, सांस्कृतिक दहीहंडी महोत्सव ‘शोले’ चित्रपट ‘गोल्डन महोत्सव’ साजरा केला जात आहे. याशिवाय, जगाला जगप्रसिद्ध करणाऱ्या गोविंदा पथकांसाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही बक्षीस मिळवण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांकडे पहाटेपासूनच गर्दी होती. मुंबईतील कोकणनगर गोविंदा पथकाने यशस्वी सलामी देऊन आपल्या पहिल्या नऊ थरांची यशस्वी सलामी दिली. यानंतर त्यांना दहा थर लावण्याची संधी देण्यात आली. या संधीनंतर त्यांनी दहा थर लावताच मैदानात जल्लोष झाला. मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आनंद व्यक्त करत २५ लाखांचे बक्षिस मंडळाला जाहीर केले.
कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी राष्ट्रभक्ती दाखवली, कोणी कितीही काही म्हणून द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करतो.