Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर महापालिकेची नजर; स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. KDMC क्षेत्रातील 661 धोकादायक इमारतींपैकी 204 अतिधोकादायक असून, त्यातील 143 इमारतींमध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास असल्याने चिंता वाढली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 03, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीतील दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
  • सर्व संबंधित इमारतींचे स्टॅक्चरल ऑडिट अनिवार्य करण्यात आले आहे
  • KDMC क्षेत्रातील 661 इमारती धोकादायक  तर 204 इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत
 

भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ६६१ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यापैकी २०४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या २०४ अतिधोकादायक इमारतींपैकी १४३ इमारतींमध्ये अद्याप नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. उर्वरित ६१ अतिधोकादायक इमारती रिकाम्या आहेत. अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या पाडणे हाच पर्याय आहे

स्वतःच्या हाताने बनवा शाडूचा बाप्पा; पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची विनामूल्य कार्यशाळा

अतिधोकादायक इमारती रिकाम्या करणे आवश्यक

महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा देऊन घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घरे रिकामी न केल्यास पोलिसांच्या मदतीने इमारती रिकाम्या करून घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. रिकाम्या असलेल्या ६१ अतिधोकादायक इमारती पाडण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी महापालिकेने १५ अतिधोकादायक इमारती पाडल्या आहेत. आता उर्वरित १४३ इमारती रिकाम्या करून घेणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे.

४५७ इमारती ‘धोकादायक’

महापालिका क्षेत्रात आणखी ४५७ इमारती धोकादायक श्रेणीत आहेत. यापैकी ६० इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी त्या पूर्णपणे रिकाम्या करणे आवश्यक आहे. तर ३६१ इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असतानाही दुरुस्ती करता येणे शक्य आहे. अन्य ३६ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. महापालिकेने सर्व ६६१ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे मालक, सचिव आणि अध्यक्षांना नोटिसा बजावून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे निर्देश दिले होते. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतरच संबंधित इमारती धोकादायक किंवा अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

Mira Bhayandar News: नागरिकांसाठी मोठा दिलासा! ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, गणेश मंडप NOC आणि Pothole ॲपचे लोकार्पण

५१ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट रखडले

नोटिसा देऊनही आतापर्यंत ५१ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट महापालिकेकडे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता महापालिका पॅनेलवरील आर्किटेक्टमार्फत या इमारतींचे ऑडिट करून घेणार आहे. याचा खर्च सुरुवातीला महापालिका करणार असून, नंतर संबंधित इमारत मालकांकडून वसूल केला जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या इमारत मालकांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, अद्याप एकाही संबंधिताकडून दंड वसूल करण्यात आलेला नसल्याची माहिती आहे.

इमारती धोकादायक घोषित ६६१

अतिधोकादायक इमारती श्रेणीत २०४

अतिधोकादायक इमारती २०४

इमारतीमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक १४३

अतिधोकादायक इमारती रिकाम्या ६१

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याण-डोंबिवलीत किती धोकादायक इमारती आहेत?

    Ans: KDMC क्षेत्रात एकूण 661 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत

  • Que: स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय?

    Ans: स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे इमारतीची मजबुती, सुरक्षितता आणि वापरण्यायोग्यता तपासणारी तांत्रिक प्रक्रिया होय.

  • Que: पावसाळ्यात जीर्ण इमारतींबाबत कोणती काळजी घ्यावी?

    Ans: भेगा पडणे, छत गळणे किंवा इमारतीत कंप जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने महापालिकेला कळवून सुरक्षित ठिकाणी जाणे आवश्यक आहे.

Web Title: Kalyan dombivli dangerous buildings structural audit action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • kalyan dombivali news
  • KDMC
  • structural audit

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
2

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा
3

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.