Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

KDMC News: कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. बिल्डरच्या सांगण्यावरून केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवत असल्याचा गंभीर आरोप कल्याण ग्रामीण २७ गाव संरक्षण संघर्ष हक्क समितीने केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 09, 2026 | 05:33 PM
बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? केडीएमसी सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? केडीएमसी सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • नांदिवलीतील पुनर्विकासावरून नवा वाद!
  • बिल्डरच्या दबावाखाली नोटिसा दिल्याचा केडीएमसी अधिकाऱ्यांवर आरोप
  • सुनील लोंढे यांच्याविरोधात संघर्ष समिती आक्रमक
कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बिल्डरच्या सांगण्यावरून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (केडीएमसी) सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवत असल्याचा गंभीर आरोप कल्याण ग्रामीण २७ गाव संरक्षण संघर्ष हक्क समितीने केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.(KDMC News)

बिल्डरच्या सांगण्यावरून नोटिसा दिल्याचा आरोप

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात पुनर्विकासाच्या हालचाली सुरू असताना नागरिकांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या जात असल्याचा मुद्दा समोर आला आहे. या नोटिसा देण्यामागे बिल्डरचा दबाव असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. बिल्डरच्या सांगण्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना नोटिसा पाठविल्या जात असतील, तर हा प्रकार गंभीर असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या घरांबाबत निर्णय घेताना नियम आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन होणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे.

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

सुनील लोंढे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न

या प्रकरणी केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांना जाब विचारण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा समितीने केला आहे. मात्र, केडीएमसीकडून सुनील लोंढे यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी मंजूर करण्यात आलेली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या सुट्टीबाबतही समितीने प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

कारवाई न झाल्यास दोन दिवसांत आंदोलनाचा इशारा

या प्रकारामुळे कल्याण ग्रामीण २७ गाव संरक्षण संघर्ष हक्क समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना नोटिसा पाठविण्यात आल्याच्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर केडीएमसी मुख्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

केडीएमसी मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची भेट

या संदर्भात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रतन पाटील, अंकुश म्हात्रे, सुमित वझे, सत्यवान म्हात्रे, मधुकर माळी, प्रल्हाद गायकर, शिवाजी माळी आणि हेमंत पाटील उपस्थित होते.

नांदिवलीतील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नागरिकांना दिलेल्या नोटिसांमागील कारणे काय आहेत, त्यामध्ये नियमांचे पालन झाले आहे का आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याबाबत केडीएमसी प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: नांदिवली परिसरात कोणत्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे?

    Ans: कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असून, नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर काय आरोप करण्यात आला आहे?

    Ans: बिल्डरच्या सांगण्यावरून सुनील लोंढे नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवत असल्याचा आरोप कल्याण ग्रामीण २७ गाव संरक्षण संघर्ष हक्क समितीने केला आहे.

  • Que: संघर्ष समितीने केडीएमसी प्रशासनाला कोणता इशारा दिला आहे?

    Ans: सुनील लोंढे यांच्यावर तातडीने कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. अन्यथा येत्या दोन दिवसांत केडीएमसी मुख्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Kdmc assistant commissioner sunil londhe builder notices nandivali kalyan east redevelopment controversy sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप
1

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा पर्याय समोर
2

पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा पर्याय समोर

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा
3

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
4

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.