Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: गुडघेदुखीने त्रस्त 52 वर्षीय महिलेला नवे आयुष्य; किम्स ठाणेत अत्याधुनिक गुडघा प्रत्यारोपण यशस्वी

गुडघ्यांच्या तीव्र वेदना आणि चालण्यात अडचणींनी त्रस्त असलेल्या 52 वर्षीय महिलेवर किम्स हॉस्पिटल्स ठाणे येथे अत्याधुनिक रोबोटिक सहाय्याने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 19, 2026 | 05:02 PM
गुडघेदुखीने त्रस्त 52 वर्षीय महिलेला नवे आयुष्य; किम्स ठाणेत अत्याधुनिक गुडघा प्रत्यारोपण यशस्वी

गुडघेदुखीने त्रस्त 52 वर्षीय महिलेला नवे आयुष्य; किम्स ठाणेत अत्याधुनिक गुडघा प्रत्यारोपण यशस्वी

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : गुडघ्याच्या तीव्र वेदना आणि चालण्यात मोठ्या अडचणींमुळे त्रस्त असलेल्या 52 वर्षीय महिलेने किम्स हॉस्पिटल्स ठाणे येथे करण्यात आलेल्या अत्याधुनिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पुन्हा स्वावलंबी आयुष्य मिळवले आहे. या महिलेच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिसचे निदान झाले होते. जे सांध्यांच्या झिजेचे अत्यंत गंभीर स्वरूप मानले जाते. त्यातच तिचा BMI 35 पेक्षा जास्त असल्यामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण येत होता आणि शस्त्रक्रियाही अधिक गुंतागुंतीची बनली होती. कालांतराने तिच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही शस्त्रक्रियेच्या वेदनांबद्दल भीती आणि मानसिक तणावामुळे ती उपचार पुढे ढकलत होती.

या रुग्णांची तपासणी डॉ स्वप्निल झांबरे यांनी केली. सविस्तर वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. रुग्णांच्या भीतीचा विचार करून वैद्यकीय टीमने शस्त्रक्रियेपूर्वी समुपदेशन आणि मानसिक आधाराला विशेष प्राधान्य दिले.

Maharashtra 1st Conclave: उद्योग, गुंतवणूक आणि नवकल्पनांचा संगम; ‘Progressive Maharashtra’ कॉन्क्लेवकडे सर्वांचे लक्ष

रुग्णावर “सबव्हॅस्टस अ‍ॅप्रोच” वापरून मिनिमली इन्वेसिव्ह आणि टाके न घालता टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. या पद्धतीत स्नायू कापण्याऐवजी त्यांचे संरक्षण केले जाते, त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरे होतात. अधिक अचूकता आणि योग्य अलाइनमेंट सुनिश्चित करण्यासाठी रोबोटिक सहाय्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णासाठी सिरेमिक नी इम्प्लांटचा वापर करण्यात आला, ज्यामुळे अधिक टिकाऊपणा आणि दीर्घकालीन कार्यक्षमता मिळते. त्यामुळे तुलनेने कमी वयाच्या रुग्णांसाठी हा पर्याय अधिक उपयुक्त मानला जातो.

टाके न घालण्याच्या तंत्रामुळे सर्जिकल क्लिप्सची गरज पडली नाही. यामुळे रुग्णांना अधिक आराम मिळाला तसेच वॉटरप्रूफ ड्रेसिंगमुळे शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेणे अधिक सोपे झाले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची प्रकृती अतिशय जलद गतीने सुधारली. ऑपरेशननंतर तिसऱ्याच दिवशी त्या आधाराने चालू शकत होत्या, स्वतःहून दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण करू शकत होत्या आणि रुग्णालयात जिनेही चढू शकत होत्या. सुधारलेल्या हालचाली आणि आत्मविश्वासासह त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी डॉ स्वप्निल झांबरे यांनी सांगितले की, “मिनिमली इन्वेसिव्ह आणि स्नायूंचे संरक्षण करणाऱ्या तंत्रांसोबत रोबोटिक अचूकतेमुळे नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचे परिणाम लक्षणीयरीत्या सुधारत आहेत. यामुळे वेदना कमी होतातच, शिवाय गुंतागुंतीच्या रुग्णांमध्येही लवकर पुनर्वसन शक्य होते.”

ऑस्टिओआर्थरायटिस हा मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण मानला जातो. या प्रकरणातून आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, रुग्णकेंद्रित उपचार आणि योग्य समुपदेशन यांच्या मदतीने शारीरिक तसेच मानसिक अडथळ्यांवर मात करता येते हे स्पष्ट होते. हे प्रकरण दाखवून देते की योग्य वेळी उपचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य वैद्यकीय दृष्टिकोन यांच्या मदतीने लठ्ठपणा आणि गंभीर सांध्यांच्या झिजेसारख्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतही रुग्णांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारता येऊ शकते.

नीट परिक्षेनंतर MH–CET मध्येही मोठा घोटाळा; सचिन सावंतांकडून चौकशीची मागणी

Web Title: Kims thane successful knee replacement surgery 52 year old woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Thane Hospital

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.