महाराष्ट्राने मागील काही वर्षांत गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स, उद्योग आणि नवकल्पना (Innovation) क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. राज्याला जागतिक गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी शासन, उद्योगजगत आणि धोरणकर्त्यांमध्ये सातत्याने संवाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे
यंदाच्या कॉन्क्लेवची प्रतिष्ठा अधिक वाढवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे (Chief Guest) म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सुरू असलेले मेगा प्रकल्प, आगामी आर्थिक धोरणे तसेच महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून कायम ठेवण्याचा दृष्टिकोन (व्हिजन) ते यावेळी मांडणार आहेत.

नवभारत कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात मान्यवर अतिथी (Guests of Honour) म्हणून महाराष्ट्र शासनातील अनेक कॅबिनेट मंत्री सहभागी होणार आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विपणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच महाराष्ट्र हाउसिंग सेल्फ-ग्रुप रिडेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच, विशेष अतिथी (Special Guests) म्हणून प्रशासकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये MMRDA महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, MSEDCL चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, AMC नगर आयुक्त अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, MMRCL चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, CIDCO चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, MSRDC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा समावेश आहे.

याशिवाय MRIDC चे एमडी राजेश कुमार जायसवाल, टुनवाल ई-मोटर्स लिमिटेडचे एमडी झूमरमल तुनवाल, टॉरल इंडिया चे संस्थापक व सीईओ भरत गीते, IOCL (पश्चिम विभाग) चे कार्यकारी संचालक दीपक दास, महाराष्ट्र व गोवा सर्कल GPO चे CPMG अमिताभ सिंह, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षली चौधरी, उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निलेश म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे महापौर मिलिंद जयराम पाटील, कुलगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिरा घोरपडे आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री कवानपुरे पाटील यांचाही समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिमन्यू काले, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन अर्धनारी शर्मा, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सजनानी, प्रधान आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, प्राइम बुलढाणा चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश जगदाळे आणि BSE चे मुख्य व्यवसाय अधिकारी समीर पाटील हेही विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
या ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आणि कॉन्क्लेवचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी Live पाहण्यासाठी YouTube वर क्लिक करा.






