
महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मुख्यमंत्र्यांसह पोलिस आयुक्तांकडे मागणी; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये वर्षांनुवर्षे कंत्राटी कामगार काम करत आहेत. आज ना उद्या प्रशासनामध्ये आपली सेवा कायम होईल, या आशेने या कामगारांनी १५ ते २५ वर्षे काम केले आहे. ठेकेदार बदली होतात, पण कर्मचारी कायम कंत्राटी संवर्गात काम करत असतात.
समान कामाला समान वेतन या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केल्या जातात. या घोषणा केवळ कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी असून निवडणूक काळात या कर्मचाऱ्यांचे मतदान मिळविण्यासाठी दाखविण्यात आलेले गाजर असते. प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांना आजतागायत समान कामाला समान वेतन मिळालेले नाही. आजही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनामध्ये काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना ईएसआय सुविधा नाही, प्रशासनाकडून मेडिक्लेम सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. कर्मचारी आजारी पडल्यास, अपघात झाल्यास पैशाअभावी उपचार करता येत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचा योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो.
प्रशासनाने आमचे गांभीर्याने घेतले नाही. मार्च २०२६ मध्ये कर्मचारी योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू पावल्यास महापालिका आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही पालिका प्रशासनाला व पालिका आयुक्तांना दिला होता. तथापि पालिका प्रशासनाने आमच्या म्हणण्याचे गांभीर्य जाणून घेतले नाही. यादरम्यान मलेरिया विभागातील कंत्राटी कामगार विवेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा देण्यासाठी ठेकेदारांना निर्देश देत नाहीत.
यामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पालिका आयुक्तच खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत. कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम व ईएसआय सुविधा नसल्याने आपण त्यांना सावंत यास अचानक मेंदूमध्ये ब्रेन स्टोक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. महागडे उपचार घेण्याची क्षमता नसल्याने त्याच्या परिवाराला उपचारासाठी धावपळ करण्यास पैशाअभावी मर्यादा पडल्या. केवळ पालिकेची इएसआय सुविधा व मेडिक्लेम नसल्याने आपल्याला विवेक सावंत हा पालिका कर्मचारी गमवावा लागला.
कामगाराच्या मृत्यूस पालिका आयुक्त जबाबदार मृत्यूपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे विवेक सावंत या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस पालिका आयुक्त कैलास शिंदे यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.