Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा! सेवानिवृत्त आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार सानुग्रह अनुदान

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेने दिवाळी सानुग्रह अनुदानाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांसह पात्र कंत्राटी आणि अतिरिक्त कर्मचारी गटांनाही ४५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 09, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई महापालिकेच्या सानुग्रह अनुदानाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय.
  • अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांना यापूर्वीच अनुदान मंजूर.
  • सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ.
 

दिवाळीच्या सणानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या लाभाची व्याप्ती वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नोव्हेंबर महिन्यातील महासभेत घेण्यात आला आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या प्रत्येकी ४५ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानात आता अतिरिक्त कर्मचारी गटांचाही समावेश करण्यात आला असून, पात्र कर्मचाऱ्यांना पूर्ण ४५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये आठही विभागांतील नागरी आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय नागरी आरोग्य धोरण म्हणजेच एनयूएचएम बाह्य स्रोत अंतर्गत अकाउंटंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही लाभ मिळणार आहे.

सुरक्षा मंडळामार्फत कार्यरत सुरक्षा रक्षक आणि विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील महासभेत सभागृह नेते सागर नाईक यांनी तातडीचा ठराव मांडत उपसूचना मांडल्याने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Navi Mumbai News: कोपरखैरणेतील नाखवा मच्छी मार्केटमधील महिलांचा व्यवसाय संकटात; अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

अनुदान देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या २ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील सागर नाईक यांच्या ठरावाच्या सूचनेनुसार हा विषय मांडण्यात आला होता. दिवाळीनिमित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी ४५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या विविध विभागांत कार्यस्त असलेल्या काही अतिरिक्त कर्मचारी गटांना या लाभापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने अनुदानाची व्याप्ती वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.

पात्रतेची पडताळणी करूनच अनुदानाचे वितरण

या अनुदानासाठी संबंधित विभागांना पात्र कर्मवाऱ्यांची सेवा कालावधी, नियुक्ती, सेवानिवृत्ती अथवा मृत्यूच्या नोंदी तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तसेच सुरक्षा मंडळाकडून मिळणाऱ्या बोनसची आणि सेवाधारित कंत्राटांमधील बोनसविषयक तरतुदींचीही पडताळणी करण्यात येणार आहे.

पात्र लाभाथ्यांची यादी, त्यांची संख्या आणि प्रत्यक्ष देव रक्कम प्रमाणित करून अनुदानापोटी यापूर्वी दिलेली रक्कम असल्यास तिचे समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक पात्र व्यक्तीला या अनुदानाचा एकदाच लाभ मिळणार आहे प्रमाणित लाभार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्यक्ष अतिरिक्त देय रकमेच्या खर्वास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Thane News: सुपर अल निनोच्या संभाव्य संकटामुळे ठाणे महापालिका अलर्ट; पाणीटंचाई रोखण्यासाठी विशेष नियोजन

एनयूएचएम अंतर्गत बाह्य स्रोत कर्मचारी पात्र

याशिवाय महापालिकेच्या विविध कामांसाठी नियुक्त केलेल्या सेवाधारित कंत्राटांमधील कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. ज्या कंत्राटांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बोनसपोटी ८.३३ टक्के रक्कम काढली जाते किंवा दिवाळी बोनसची तरतूद आहे, असे कंत्राट वगळण्यात येणार आहेत. उर्वरित ज्या कंत्राटांमध्ये दिवाळी बोनसची तरतूद नाही, अशा कंत्राटांअंतर्गत काम करणाऱ्या पात्र बाह्ययंत्रणांतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पूर्ण ४५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात पालिका क्षेत्रातील आठही विभागांतील नागरी आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय नागरी आरोग्य धोरण म्हणजेच एनयूएचएम बाह्य स्रोत अंतर्गत अकाउंटंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना किती दिवाळी अनुदान मिळणार आहे?

    Ans: पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ४५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

  • Que: कोणत्या कर्मचाऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे?

    Ans: महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, सुरक्षा रक्षक आणि पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

  • Que: प्रत्येक कर्मचाऱ्याला किती वेळा अनुदान मिळणार आहे?

    Ans: प्रत्येक पात्र व्यक्तीला या सानुग्रह अनुदानाचा लाभ केवळ एकदाच मिळणार आहे.

Web Title: Navi mumbai municipal corporation employee diwali bonus pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Municipal Corporation
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: कोपरखैरणेतील नाखवा मच्छी मार्केटमधील महिलांचा व्यवसाय संकटात; अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
1

Navi Mumbai News: कोपरखैरणेतील नाखवा मच्छी मार्केटमधील महिलांचा व्यवसाय संकटात; अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.