
ठाणे : लहान मुली, महिलांसोबत गर्दीच्या ठिकाणी दुचाकीस्वाराकडून अनेकदा विनयभंगाच्या घटनाा घडत असतात. अशावेळी तक्रार करण्यात आली तरीही दुचाकीवर असलेल्या आरोपीला पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. मात्र अशाप्रकारे डोंबिवलीतील एका मुलीसोबत घडलेल्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासाठी पोलिसांनी तब्बल 3200 दुचाकींचा तपास करत आरोपीचा शोध घेतला आहे.
लहान मुलींवरही वाईट नजर ठेवलेल्या नराधमांची भीती कायम आहे. डोंबिवलीतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या मुलीनं घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितलं. घरातले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेतली. संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला. पण यानंतर खरं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. पण आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली युनीकॉन बाईकचा शोध सुरू केला या साठी पोलिसानी आरटीओ कडून डोंबिवलीत किती जणांकडे युनीकॉन बाईक आहेत याची माहिती मागवले आरटी कडे दहा हजार जणांकडे अशा प्रकारची बाईक असल्याची नोंद होती. त्यामध्ये ब्लॅक कलरची बाईक 3200 आहेत. त्यापैकी सोनारपाडा परिसरात 80 जणांकडे ही बाईक आहे. मात्र कोणत्या ब्लॅक कलरच्या युनिकॉन गाडीचे इंडिकेटर तुटले आहे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं इंडिकेटर तुटलेली एक गाडी शोधून काढली. ती गाडी अमन यादवची होती. पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखीन किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा तपास आत्ता पोलिस करीत आहेत.
[read_also content=”https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/prasad-lad-statement-about-pravin-darekar-accident-nrps-241428.html प्रवीण दरेकरांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील”]