Mumbai Local Update: ठाण्यावरून सुटणारी ट्रान्सहार्बर लोकलसेवा बंद, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी! 'हे' आहे कारण
तुर्भेला आज सकाळी अचानक 7.30 वाजण्याच्या सुमारास ब्रिज तुटल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील ट्रेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे स्टेशनच्या 9 आणि 10 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असल्याची पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यावरून वाशी – नेरुळ – पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम झाला असून ही लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इस्लामाबाद ते कराची हादरले! भारताच्या INS विक्रांतची धमाकेदार एन्ट्री, पाकची हवा टाइट
सकाळी लोकांची कामावर जाण्याची घाई असते. अशातच लोकलसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाण्यावरून सुटणारी 7 वाजून 17 मिनिटांची ठाणे – वाशी लोकल सुमारे 2 तासांपासून ठाणे स्टेशनवर आहे. लोकलसेवा बंद झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक युजर्सनी पोस्ट शेअर करत लोकल ट्रेनबाबत अपडेट शेअर केली आहे. शिवाय प्लॅटफॉर्मवर देखील प्रवाशांसाठी अनाऊंसमेंट करण्यात आली होती. यावेळी सांगण्यात आलं की, तुर्भे स्थानकाजवळ एका नव्या ब्रिजचे बांधकाम सुरु होतं. मात्र आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा ब्रिज अचानक कोसळला. यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे ठाणे स्थानकावरून वाशी – नेरुळ – पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मुंबईत लोकल ट्रेनच्या ट्रान्स हार्बर आणि सेंट्रल लाईन बंद आहेत…
प्रवास करताना याची नोंद घ्या !!!युद्धाच्या बातम्यांमध्ये या बातम्या दिसणार नाहीत.#mumbailocal
— R.R.Mhatre (@MhatreFrmAlibag) May 9, 2025
ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळी लोकांची कामावर जाण्याची घाई असते आणि अशातच लोकलसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावं लागत आहे. ठाणेवरून वाशी – नेरुळ – पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसेवा अगदी मर्यादित आहेत. या लोकलसेवा देखील बंद झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
ऐन युद्धावेळी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना अटक; शमशाद मिर्झा होणार पाकचे नवे लष्करप्रमुख
मध्य रेल्वे लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे लोकलसेवा विस्कळित झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. या मार्गावरील लोकल सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
Mumbai local trains central line are late by 45 minutes..that too in peak hours..
What a shameless management..have no respect for time..@drmmumbaicr @Central_Railway— Micro A52 (@MicroA52) May 9, 2025
Mumbai Local trains at Central Railway are running very late today. No announcements yet on the reasons.@Central_Railway
— iVeeRaM 🇮🇳 (@iVeeRaM) May 9, 2025