असीम मुनीर युद्ध यांच्या जागी शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
कराची : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. भारताच्या नौदल, लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. भारताच्या तिन्ही दलाने पाकिस्तानची कोंडी केली आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी विरोधात ऑपरेशन सिंदूर केले. मात्र यानंतर, पाकिस्तानने गुरुवारी रात्री उशिरा भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या विविध प्रमुख शहरांवर संयुक्त हल्ले सुरू केले. यामध्ये पाकिस्तानची बोळवण झाली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची उचलबांगडी होणार आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पदावरुन काढण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून जागी शमशाद मिर्झा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भर युद्धामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख बदलण्यात आले आहेत. शमशाद मिर्झा यांना पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनवले जाईल. या बातमीने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. याचबरोबर आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. विमानतळाभोवती उच्चपदस्थ अधिकारी विमान पकडण्याचा प्रयत्न करताना दिसले. ही बातमी समोर येताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय हल्ल्यांची तीव्रता आणि अचूकता पाहता पाकिस्तानी नेतृत्वात भीती निर्माण झाली आहे, काही अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये या घटनेच्या चर्चेमुळे राजकीय आणि लष्करी गटांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानच्या लोकांना या बातमीने काळजी वाटू शकते की जर त्यांचे उच्च अधिकारी युद्धात टाकून देश सोडून गेले तर त्यांचे संरक्षण कोण करेल? असा प्रश्न पाकिस्तानच्या नागरिकांना पडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी
पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय तिन्ही दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. LOC वर देखील गोळीबार सुरु झाला असून सीमा भागामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. परिसरामधील लाईट, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भारताने इस्लामाबाद, कराचीवर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर देखील भारताच्या आयएनएस विक्रांत कडून हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर म