Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाण्यात भिमसैनिकांचा जल्लोष ; संविधान गौरव यात्रेला मोठी गर्दी

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व भारतीय संविधान अमृतमहोत्सवर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2025 | 03:43 PM
Thane News :  ठाण्यात भिमसैनिकांचा जल्लोष ;  संविधान गौरव यात्रेला मोठी गर्दी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व भारतीय संविधान अमृतमहोत्सवर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली. भाजपा खोपट कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार घालून भन्ते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅलीस सुरुवात झाली. आंबेडकर रोड, कोर्ट नाका येथील संविधान चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली समाप्त झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले. या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमला आ. केळकर, आ. डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पुढे कोर्ट नाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेस आ. केळकर, आ. डावखरे, संजय वाघुले व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पसृष्टी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून पुढे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. बाजारपेठेतून रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर व बाबासाहेबांच्या तसबीरीवर फुलांचा वार्षाव केला. स्टेशन रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीचा समरोप करण्यात आला.

आमदार संजय केळकर यांनी बोलताना सांगितले की, ठाणे नगरी ही डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. डॉ. आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली. न्याय हक्क मिळाला. या घटनेचा व आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिला. सर्वांचा विकास सामाजिक न्याय बाबत कटीबद्ध असावे ही शिकवण त्यांनी दिली. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. तर आ. डावखरे यांनी नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, बौद्ध धर्मगुरू, भन्ते, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव व असंख्य भीमसैनिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहत पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जय घोषाने वातावरण भीममय झाले होते.

 

Web Title: Thane news bhim army soldiers celebrate in thane huge crowd for constitution gaurav yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Ambedkar Jayanti 2025
  • dr babasaheb amdekar
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
2

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त
4

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.