Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : साफसफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष ; नाला तुंबल्यामुळे ठाणेकर आक्रमक

रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्याने ठाणेकर आक्रमक झाले आहे.  बाळकुम दादलानी परिसरातील नाल्याची साफसफाई न केल्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढत जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 24, 2025 | 01:44 PM
Thane News : साफसफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष ; नाला तुंबल्यामुळे ठाणेकर आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा काकडे : पावसाळा सुरु होण्याआधी नालेसफाई करणं हे पालिकेचं मुख्य़ काम आहे. मात्र नाल्याच्या साफसफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची बाब उघड झाली आहे. रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्याने ठाणेकर आक्रमक झाले आहे.  बाळकुम दादलानी परिसरातील नाल्याची साफसफाई न केल्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढत जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नियमितपणे पाहणी करावी, पूर्वीसारखी नालेसफाई यंदा झाली तर ठाणेकर अधिकारी आणि ठेकेदारांना सोडणार नाहीत, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

नालेसफाईत दरवर्षी होत असलेल्या हात की सफाईचा अनुभव लक्षात घेत आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मनोरमा नगर, कोलशेत, बाळकुम, राबोडी, कॅसल मिल, खोपट एसटी डेपो, शहीद गार्डन, रायगड आळी आदी परिसरातील नाल्याची पाहणी केली. यावेळी नाल्यांच्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत कंत्राटदार आणि प्रशासनाला गर्भित इशारा दिला. या पाहणीत त्यांना नाल्यांची दुरवस्था नजरेस पडली. यावेळी त्यांनी ठेकेदारांच्या बनवाबनवीचे दाखलेही दिले. कोणता नाला कुठे थांबतो आणि कुठे जोडला गेला आहे, हे देखील ठेकेदाराला माहिती नसल्याने त्याची माहिती आम्हाला द्यावी लागली. कारण या ठेकेदारांनी नालेसफाई करण्यापूर्वी फिरून त्याची पाहणीच केलेली नाही. केवळ चार भिंतीत बसून बिले तयार करत असल्याचा आरोप संजय केळकर यांनी केला आहे.

नालेसफाई करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, यांत्रिक सामुग्री आणि कामाचे तास याबाबत ठेकेदार लपवाछपवी करत असतात. अधिकचे काम दाखवून प्रत्यक्षात वरवर सफाई केली जाते, बिले मात्र पूर्ण कामाची काढली जातात. त्यामुळे आम्ही आतापासूनच त्यांच्या कामावर नजर ठेवून आहोत. नालेसफाईसाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात हात की सफाई होऊ नये म्हणून आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून वेळोवेळी पाहणी करावी, गतवर्षीप्रमाणे यात फसवणूक झालेली आढळून आली तर ठाणेकर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीत, असा इशारा केळकरांनी दिला आहे.

रुस्तमजी येथील नाल्याला रस्त्याचे स्वरूप आले असून बाळकुम येथील नाल्याला टर्फचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे चुकून तरुण मंडळी तेथे खेळायला जातील, अशी उपहासात्मक टीकाही श्री.केळकर यांनी केली. ‘आम्ही काही महिन्यांपूर्वी आदर्श नाले दत्तक योजना लोकसहभागातून राबवली. त्या नाल्यात ना गाळ, ना कचरा दिसत आहे. शिवाय आच्छादनामुळे परिसराच्या सौंदर्याला कोणतीही बाधा नाही आणि दुर्गंधीपासून देखील सुटका झाली आहे. या योजनेचा आदर्श घेऊन शहरातील नालेसफाईची कामे व्हावीत, अशी अपेक्षा केळकरांनी व्यक्त केली.आहे.

यावेळी पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्याबरोबर माजी नगरासेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, रमाकांत मढवी, सचिन पाटील, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, संजय कदम, सचिन शिनगारे, निलेश पाटील, जितेंद्र मढवी, हेमंत म्हात्रे, महेश कदम, प्रमोद घोलप, विशाल वाघ, विक्रम भोईर आदी उपस्थित होते.

Web Title: Thane news municipalitys negligence towards cleanliness thane residents are aggressive due to clogged drains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • political news
  • thane

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
2

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
3

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
4

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.