Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शनाने आ. विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ ! रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, आमदार विश्वनाथ भोईर यांनी टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

  • By नारायण परब
Updated On: Nov 05, 2024 | 08:02 PM
टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शनाने आ. विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ ! रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :- कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात झाली. टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांनी मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडाकेबाज कामगिरी आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्याकडून झालेली विकासकामे या जोरावर मतदार आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवतील असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.

टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत आपला निवडणूक प्रचार सुरू केला

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन झाले. त्यानंतर आज लगेचच विश्वनाथ भोईर यांनी टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत आपला निवडणूक प्रचार सुरू केला.यावेळी टिटवाळा मंदिर परिसरापासून वाजत गाजत भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी,रिपाइं महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्या त्या ठिकाणी स्थानिकांचा विश्वनाथ भोईर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा- नवी मुंबईमध्ये महायुती अ‍ॅक्शन मोडवर;पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार सभा

विकासकामांच्या बळावर मतदार पुन्हा विधानसभेत पाठवणार – विश्वनाथ भोईर

तर कोविडनंतरच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत धडाकेबाज लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील जनता आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूकीमध्ये विश्वनाथ भोईर हे 2019 मध्ये 22 हजारापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते. यावेळी त्यापेक्षाही जास्त मतांनी आमदार विश्वनाथ भोईर निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेमध्ये या मतदारसंघातून युतीचा उमेदवार पुढे होता त्यामुळे जनतेची साथ भोईर यांना आहे  अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

या रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक मयूर पाटील, संजय पाटील, महिला शहर संघटक नेत्रा उगले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, संतोष (आप्पा) तरे, माजी नगरसेविका वैशाली भोईर, युवासेना उपशहर प्रमुख विकास भोई, शाखाप्रमुख रोशन चौधरी यांच्यासह किरण पाटील, अशोक चौरे, बबलेश पाटील, निता देशेकर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा- पनवेलमध्ये पाटील vs पाटील vs पाटील, तर उरणमध्ये म्हात्रे vs म्हात्रे लढत, नेमका काय प्रकार?

Web Title: The campaign of mahayuti candidate vishwanath bhoir started with the darshan of mahaganapati in titwala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 08:02 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Vishwanath Bhoir

संबंधित बातम्या

Kalyan News: जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी
1

Kalyan News: जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
2

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.