रायग़डमध्ये महायुती अॅक्शनमो़डवर;पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार सभा
पनवेल ग्रामीण/ दिपक घरत : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती युद्धपातळीवर रणनिती आखत आहे. निवडणूकीच्या काही दिवस आधी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईतील पनवेल, नवी मुंबई आणि उरण विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून महायुतीच्या उमेदवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती विधान परिषदेचे भाजपा आमदार विक्रांत पाटील यांनी दिली आहे.
आमदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या उमेदवारांसाठी नवी मुंबईत सभेचं आजोजन करण्यात येत आहे. ही सभा खारघर परिसरात होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात 20 नोव्हेंबर ला एकाच टप्यात विधानसभा निवडणूक रंगणार आहे. सोमवारी ( ता. 4)अर्ज मागे घ्यायच्या दिवशी काही उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने मैदानात उरलेल्या उमेदवारकडून मंगळवार ( ता. 5) पासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे.
हेही वाचा-Maharashtra Election : नितेश राणे आणि पारकरांनी मला हलक्यात घेवू नये; नवाज खनी यांचा इशारा
भाजपा सध्या विधानसभा निवडणूकीसाठी अॅक्शनमो़डवर असल्याचं दिसून येत आहे. खारघर येथे जाहीर केलेल्या उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. निवडणूकीच्या या रणधुमाळीत उमेदवारांना संबोधित करण्यासाठी या सभेचं आयोजन होत आहे.
महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत रंगणार असल्याने सर्वच पक्षातील प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. आपापल्या पक्षातील उमेदवार विजयी व्हावा या दृष्टीने स्टार प्रचाराकांच्या सभाचें आयोजन करण्यात आले आहे. याचधर्तीवरमहायुतीकडून पंतप्रधान मोदी यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, मात्र अद्याप विरोधी गट महाविकास आघाडीकडून प्रचारसभेचं आयोजन हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा-“मी निवडणूक लढवणार नाही…सत्ताबदलातील महत्त्वाचा मास्टरमाईंड, शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?
राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजला आहे. अटीतटीच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. अशातच सभा संमेलन घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जाहीर सभेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग देशात आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मोदी यांना मानणारा वर्ग महायुतीच्या उमेदवारा पाठी खंबीरपणे उभा राहण्याची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन महायुतीच्या नेत्यांनी केल्याची माहिती उपलब्ध होत आहे.असे झाल्यास महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.