विश्वनाथ भोईर यांनी कल्याण मतदारसंघातील 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांची घेतली भेट
बाबा खान, कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा आढावा घेण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या भेटी घेत योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनाही लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली. भोईर यांनी मतदारसंघातील तीन हजारांहून अधिक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना आखली आहे.
आमदार भोईर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केले आहे. प्रत्येक मंत्र्याने आणि आमदारांनी लाकडी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट घ्यावी. राज्यभरात अडीच कोटी लाडक्या बहिणी आहे. सप्टेंबरपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्या प्रत्येक बहिणीच्या घरी मुख्यमंत्री स्वत: जाऊ शकत नाही.
आमदार, खासदार लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी बहिणीच्या घरी जाऊन विचारपूस करुन त्या बहिणी या योजनेमुळे आनंदी आहेत का हे पाहावयाचे आहे. सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबिय अत्यंत खूष आहे. ते विचारण्यासठी आज कल्याणमधील लाडकी बहिणींच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्या बहिणींनी सांगितले की, दादा महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून मला जे १५०० रुपये येतात. सकाळी घर खर्चाला नवऱ्याकडे हात पसरण्या पेक्षा त्यावरून होणारी होणारी कटकट थांबली आहे. त्यामुळे त्या आनंदी आहेत.
मुख्यमंंत्री कौतूकास पात्र आहे. राज्यातील बहिणींविषयी त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. या योजनेतून मिळालेया पैसाचा वापर घर खर्चासाठी केला जाऊ शकतो असे एका लाडक्या बहिणीने सांगितले. आमदार आमच्या भेटीसाठी आले. त्यांनी खूप चांगली योजना सुरु केली आहे. ही योजना अशीच पुढे चालू राहावी. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. महिला आपल्या पायावर उभ्या राहू शकतात. महिन्याला दीड हजार देणे ही फार महत्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला आहे असे एका लाभार्थी महिलेने सांगितले. आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदारसंघातील 3000 लाभार्थ्यांना भेटणार आहेत आज त्यांनी कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील असलेल्या सात कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन लाभार्थ्यांची भेट घेतली.