Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

राज्यातील 14 ठिकाणी महायुती तुटलेली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 30, 2025 | 04:50 PM
BJP-Shinde group alliance has broken down in 14 places in the state

BJP-Shinde group alliance has broken down in 14 places in the state

Follow Us
Close
Follow Us:
  • महानगरपालिका निवडणुकांच्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण  तापले
  • भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या युतीतही फूट
  • राज्यात १४ महापालिकांमध्ये भाजप-सेनेची युती तुटली
BMC Municipal Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Election 2026) घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याभरात आज राजकीय पक्षांमध्ये मोठ्या मोठ्या घडामोडीही घडल्या. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांना पक्षांकडून तिकीट मिळाल्याने अनेक ठिकाणी आंनदाचे वातावरण होते.तर काही ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचेही पाहायला मिळाले. पण त्याच वेळी पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केली. अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांत प्रवेश करणाऱ्यांना तिकीट दिल्यामुळे मोठा अंसतोष उफाळल्याच्याही घटना घडल्या.

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

राज्यात सर्वात ताकदीची मानली जाणारी भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या युतीतही फूट पडल्याचे पाहायला मिळाले. महायुतीत जागावाटपावरून झालेल्या मतभेदांवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना फुटली. काही महापालिकांमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली. त्यामानाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमी जागा मिळत असल्यामुळे शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये लढण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय समीकरणे आणि ग्राऊंडलेव्हलवर असलेली परिस्थिती पाहता दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.

जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे राज्यात १४ महापालिकांमध्ये भाजप-सेनेची युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, नाशिक,नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या महापालिकांमध्ये तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यताही वर्तवलीजात आहे.

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

महायुतीत तडे असले तरी मुंबई–ठाण्यात भाजप-शिंदे गटाची युती कायम

राज्यातील 14 ठिकाणी महायुती तुटलेली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना युतीपासून दूर ठेवण्यात आल्याने मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे वेगळी असणार आहेत.

महायुतीतील अंतर्गत मतभेद अनेक ठिकाणी उघड झाले असले, तरी मुंबई आणि ठाणे या प्रतिष्ठेच्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट अजित पवार गटाला या दोन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये स्थान न दिल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

दरम्यान, राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.

ज्या ठिकाणी युती कायम आहे आणि ज्या ठिकाणी युती तुटली आहे, त्या दोन्ही परिस्थितीत मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी निकालांमधून महायुतीच्या रणनीतीला कितपत यश मिळते, हे स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: The bjp shinde group alliance has broken down in 14 places in the state which are these municipal corporations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?
1

Maharashtra Politics: “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?

Municipal Election 2026:  महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते डावलले; नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटांची लॉटरी
2

Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते डावलले; नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटांची लॉटरी

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
3

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?
4

आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.