Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यू-टर्न घेण्याचा प्रयत्नच नडला; कंटेनरला धडकून सिमेंट मिक्सर उलटला, चालकाचा मृत्यू

दोन्ही वाहने वाट शोधत वळणावर थांबली. त्याचवेळी (टीएस 22-टी 9423) सिमेंट मिक्सर ट्रक नागपूरच्या दिशेने येत होता. या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरची केबिनच उखडली गेली. यानंतर मिक्सर ट्रक विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या स्वप्नीलच्या कारवर उलटला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2024 | 11:34 AM
वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपरून परतणाऱ्या कुटुंबाबर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपरून परतणाऱ्या कुटुंबाबर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : यू-टर्न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्यानंतर सिमेंट मिक्सर असलेला ट्रक उलटला. यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा वर्धा मार्गावर जामठा टी-पॉइंट परिसरात हा भीषण अपघात झाला. घटनेवेळी लगतच एका कारमध्ये 4 जण होते. ते अगदी थोडक्यात बचावले.

हेदेखील वाचा : शेतमालकाच्या मुलाची मजूराच्या मुलीवर पडली नजर; लैंगिक अत्याचार केला अन् मुलगी गरोदर राहताच…

रामलाल चौरान (वय 50, रा. राजस्थान) असे मृताचे नाव आहे. स्वप्नील हुलके (वय 33, रा. रा. दिवाण ले-आउट, मानेवाडा) असे या प्रकरणातील तक्रारदार प्रत्यक्षदर्शीचे नाव आहे. शनिवारी स्वप्नील आपल्या 3 मित्रासोबत वर्धा मार्गावरील रेस्टॉरंटमध्ये जेवाण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री 3.30 वाजताच्या सुमारास सर्वजण स्वप्निलच्या कारमधून शहरात परत होते. जामठा टी-पॉईंटवरून स्वप्नीलला यू-टर्न घ्यायचा होता. त्याचवेळी (केए 41- डी 4415) कंटेनर ट्रकचा चालक रामलाल याला यू-टर्न घेऊन वर्ध्याकडे जायचे होते.

दोन्ही वाहने वाट शोधत वळणावर थांबली. त्याचवेळी (टीएस 22-टी 9423) सिमेंट मिक्सर ट्रक नागपूरच्या दिशेने येत होता. या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरची केबिनच उखडली गेली. यानंतर मिक्सर ट्रक विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या स्वप्नीलच्या कारवर उलटला. योगायोगाने ट्रक कारच्या बोनेटवर उलटला. सुदैवाने कारमधील चारहीजण थोडक्यात बचावले. घटनेनंतर वर्धा मार्ग जाम झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी रामलाल आणि मिक्सर ट्रकच्या जखमी चालकाला उपचारासाठी एम्स रुग्णालयात पाठवून दिले. उपचारादरम्यान रामलालचा मृत्यू झाला.

अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात अडचण

अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवणे हे अत्यंत अवघड होते. 2 क्रेन लावूनही ट्रक हलत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. पोलिसांनी मिक्सर ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तो जखमी झाल्याने त्याची ओळख पटलेली नाही.

हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Web Title: The cement mixer overturned after hitting the container nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Nagpur Accident

संबंधित बातम्या

Nagpur Accident : दारूच्या नशेत जवानाने भरधाव चालवली कार; ३० जणांना मारला कट, जमावाने दिला चोप
1

Nagpur Accident : दारूच्या नशेत जवानाने भरधाव चालवली कार; ३० जणांना मारला कट, जमावाने दिला चोप

वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू
2

वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.