समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण (फोटो सौजन्य: Freepik)
अंजनगांव सुर्जी : अंजनगांवसुर्जी येथील शेतातील पोल्ट्री फार्मवर रखवालीचे काम करणाऱ्याच्या 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. शेतमालकाच्या मुलानेच हा घृणास्पद प्रकार केल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना पीडित मुलगी गरोदर झाल्यामुळे उघडकीस आली. याप्रकरणात अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी अमर अशोक रेखाते (वय 39) याला अटक केली.
हेदेखील वाचा : महाड हादरलं ! अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; पोलिसांत तक्रार येताच…
अंजनगांवसुर्जीतील खोडगाव रोडवर रेखाते यांचे बागायती शेत असून, शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. पोल्ट्रीच्या शेडवर देखभाल व देखरेखीस रखवालदार असून, ते पत्नी व 17 वर्षीय मुलीसोबत शेतातील झोपडीत गेल्या तीन वर्षांपासून रखवालीचे काम करत राहतात. अमर हा शेतात ये-जा करत असताना, त्याने रखवालदाराच्या मुलीचा प्रेमजाळ्यात फसविले. तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, ती मुलगी गरोदर राहिली. तिची प्रकृती बिघडल्यानंतर, तिला रुग्णालयात तपासणीकरिता नेण्यात आले. त्यावेळी तिची प्रसूती झाली. त्यामुळे या घटनेची माहिती अंजनगाव सुर्जी पोलिसांना देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीकारी डॉ. अमोल नालट यांनी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांनी पीडितेच्या बयाणावरून आरोपी अमर रेखातेविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
रुग्णालयातच सुरु झाल्या प्रसूती कळा
पीडिता दुसऱ्याच प्रकृतीचे कारणाने चार दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु ती गरोदर असल्याने तिला प्रसुती कळा सुरू झाल्या. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडित मुलीसह तिच्या बाळाला पुढील उपचारकरिता अचलपूर येथे पाठविण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात बिल्डरने केला तरूणीवर अत्याचार
कोथरूड येथील एका बांधकाम व्यावसायिकावर तरुणीवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वत:चा घटस्फोट झाल्याचे सांगून त्याने अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तर या पीडितेचा बळजबरीने गर्भपातही केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.