Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय! कष्टकरी,शेतकरी कुटुंबातील मुलांवर अन्याय करणारा निर्णय तत्काळ रद्द करावा ; आरपीआची शासनाकडे मागणी

२० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा. त्याऐवजी सरकारने ग्राम स्तरावर अधिक आधुनिक सुखं सुविधा पुरवून मुलांना बंद करण्याचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. अन्यथा शाळा नाही तर मत नाही अशी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा आरपीआय पक्षाने दिला आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 03, 2023 | 04:37 PM
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय! कष्टकरी,शेतकरी कुटुंबातील मुलांवर अन्याय करणारा निर्णय तत्काळ रद्द करावा ; आरपीआची शासनाकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

वाई : २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा. त्याऐवजी सरकारने ग्राम स्तरावर अधिक आधुनिक सुखं सुविधा पुरवून मुलांना बंद करण्याचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. अन्यथा शाळा नाही तर मत नाही अशी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा आरपीआय पक्षाने दिला आहे.

यासंदर्भात पक्षाच्यावतीने गटविकास अधिकारी नारायण घोलप यांना निवेदन दिले असुन त्यामधे म्हंटले आहे की, कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये साहित्य सुविधा त्याच बरोबर मुलांची सर्वांगीण प्रगती यांचा अभाव असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे समूह शिक्षण (कॉम्प्लेक्स एज्युकेशन) ही नवी प्रणाली राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मात्र हा निर्णय वास्तविक स्वरूपात असफल ठरणार हे ग्रामीण भागातील जनतेचे मत आहे कारण हे सर्व करत असताना ज्या दुर्गम व इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आपण करत आहात त्या विध्यार्त्यांच्या वास्तविक जीवनात होत असणाऱ्या अडचणींना समोर ठेऊन घेण्यात आला आहे का ? हा सर्वात मोठा प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा आहे. दुर्गम भागात राहणारे आर्थिक दृष्ट्या सक्षम पालक आपल्या पाल्याला सर्वसुविधा असणाऱ्या शाळेमध्ये टाकण्यास समर्थ आहेत मात्र जे पालक सामान्य आहेत तेच पालक शाळा आपल्या गावात व परिसरात असावी अशी अपेक्षा करतात आणि ती वास्तविकतेला धरून आहे. एका बाजूने दुर्गम भागात दळणवळणासाठी होत असणाऱ्या अडचणी सोडविण्यात शासन मोठ्या प्रमाण कमी पडत आहे दुर्गम भागात मोठ्या प्रमाणत शेतकरी व कामगार वर्ग राहतो जो यासाठी होणारा खर्च पेलू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार शासनाकडून करण्यात आलेला नाही पण तरीही हा निर्णय शासनाकडून घेण्यात येत आहे. ज्या जवळपास ६५००० शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याशाळांवर कोट्यवधींचा खर्च मागील अनेक वर्षात शासनाने केला आहे त्याच शाळांवर योग्य पद्धतीने खर्च व योग्य सुविधा शासनाकडून देण्यात आल्यास असत्या तर मोठ्या प्रमाणात पालक हा प्रायव्हेट व इतर खाजगी संस्थांच्या शाळांकडे आकर्षित झाला नसता. खरतर खाजगी शाळांमध्ये शिक्षक व शासकीय शाळांमधील शिक्षक यांच्या मध्ये असलेल्या गुणवत्ता मध्ये खूप फरक आहे. आज शासकीय शाळांमधील शिक्षक हा जास्त पगार घेत असेल तर त्याचे एकमेव कारण ही त्याच्यातील गुणवत्ता आहे मग त्याला योग्य पगार दिला जातोय पण त्याला योग्य शालेय सुविधा सुद्धा शासनाने देणे गरजेचे आहे म्हणजे बहुतांश पालक आपले पाल्य इतर ठिकाणी पाठवणाराच नाही मात्र यावर शासनाकडून ठोस उपाय योजना राबविल्या गेल्या नसल्यामुळे पालक वर्ग हा खाजगी शाळांकडून मागील अनेक वर्षात आकर्षित झाला आणि त्यास शासन व शासनाचे धोरण जबाबदार आहे.

महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्त्वाचा वाटा हा शासकीय शाळांचा आहे. सर्वाधिक गुणवान विद्यार्थी हे शासकीय शाळांमधून पुढे आले आहेत आणि त्याचे एकमेव कारण हे दर्जेदार शिक्षक आहेत आणि ही प्रक्रियाच थांबली तर सर्वसामान्य शेतकरी कामगार घटक हे शिक्षणापासून वंचीत राहणार यात काही शंका नाही.त्यामुळे शासनाने हा आदेश तत्काळ रद्द करावा व शाळांना सर्व सुविधा देत सक्षम करणारा नवा सुधारित आदेश तयार करावा ही विनंती.अन्यथा भविष्यात “आम्हाला शाळा नाही तर तुम्हाला मत सुध्दा नाही” हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला घ्यावा लागेल. असा इशारा अशोकराव गायकवाड यांनी दिला आहे.

Web Title: The decision to close schools with low numbers the decision which is unfair to the children of hardworking farming families should be canceled immediately demand of rpa to govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2023 | 04:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.