Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

कलियुगात माणसाला माणुसकी राहिलेली  नाही असं म्हटलं जात असतानाच सफाई कर्माचाऱ्याच्या या चांगुलपणाने सर्वांची मनं जिंकून घेतली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 23, 2025 | 05:19 PM
KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक
Follow Us
Close
Follow Us:
  • कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…;
  • कर्मचाऱ्याने केलं असं काही की सर्वत्र झालं कौतुक
  • सफाई कर्मचाऱ्यांचा प्रमाणिकपणा

कल्याण : सोन्याच्या किंमती एकीकडे दिवसागणिक नवनविन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हारही टाकून दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी या सोन्याच्या महागड्या हाराबाबत कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला हा हार परत मिळवून दिला आहे. कलियुगात माणसाला माणुसकी राहिलेली  नाही असं म्हटलं जात असतानाच सफाई कर्माचाऱ्याच्या या चांगुलपणाने सर्वांची मनं जिंकून घेतली.

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी

KDMC आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे आज सकाळीही कल्याण पूर्वेच्या विविध भागातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. त्याचदरम्यान सकाळी कचरा घेण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कचरा देताना त्यामध्ये नजरचुकीने एका महिलेकडून सोन्याचा हारही टाकला गेल्याची तक्रार सुमित कंपनीचे 4 जे प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली.

त्यावरून ही तक्रार आलेल्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना समीर खाडे यांनी या सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. आणि त्यांनी लगेचच कचरा संकलन केलेली ही गाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर नेण्याच्या सूचना गाडीचालकाला केली. तसेच हार गहाळ झालेल्या महिलेलाही या इंटरकटिंग पॉइंटवर बोलवण्यात आले. त्यावेळी या गाडीमध्ये गोळा करण्यात आलेला कचरा संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष वेगळा करण्यात आला. आणि त्यामध्ये या महिलेकडून चुकून आलेल्या सोन्याच्या हाराचा यशस्वीपणे शोध घेऊन तो हार पुन्हा त्या महिलेच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या समीर खाडे यांनी दिली.केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे या महिलेसह सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे. तर आपला महागडा सोन्याचा हार सुखरूप परत मिळाल्याबद्दल या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

‘लाडकी बहीण योजना बंद होणार’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Web Title: The honesty of the sanitation workers led to the return of a gold necklace accidentally found in the garbage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • KDMC
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी
2

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन
3

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Ahilyanagar :  एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती उपलब्ध; आयुक्तांनी दिली माहिती
4

Ahilyanagar : एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती उपलब्ध; आयुक्तांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.