Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारनं दूर केली लाडक्या बहिणींची चिंता; महिला बालविकास विभागाने बँकांना केली ‘ही’ सूचना

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 23, 2024 | 03:18 PM
राज्य सरकारनं मिटवली लाडक्या बहिणींची चिंता; 'ही' अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या बँकांना सूचना

राज्य सरकारनं मिटवली लाडक्या बहिणींची चिंता; 'ही' अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या बँकांना सूचना

Follow Us
Follow Us:

यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यास महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा होणार आहेत. दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आतापर्यंत जवळपास सव्वा कोटींच्या आसपास महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र अनेक महिलांना पैसे अजून मिळाले नाहीत. वेगवगेळ्या चार्जेस अंतर्गत बँक महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेत आहेत. मात्र महिलांना येणाऱ्या या अडचणींची दखल राज्य सरकारने घेतली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात या योजेनचे पैसे जमा होत आहेत. एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. आधार कार्ड लिंक असणाऱ्या खात्यात हे पैसे जमा केले जात आहेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकेने कापून घेतले आहेत. मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने लागणारे चार्जेस बँकेने लावल्याने तसेच चार्जेस लावल्याने महिलांच्या १५०० ते ३००० रुप्यांमधील रक्कम कापून घेतली आहे. यामुळे महिलांनी बँका आम्हाला पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली आहे. तर काही जणांना योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये – महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही… pic.twitter.com/ASPT5X9V2F
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 22, 2024

राज्य सरकारच्या बँकांना सूचना

राज्य सरकारने महिलांच्या या अडचणींवर बँकांना सूचना दिल्या आहेत. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत एक्स वर पोस्ट शेअर केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना राज्य सरकारने सर्व बँकांना दिल्या आहेत. जर का कोणत्याही कारणासाठी लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असल्यास, ते पूर्ववत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण पैसे महिलांना मिळणार आहे.

Web Title: The maharashtra government made a big decision regarding mazi ladki bahin yojna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government
  • Mazi ladki bahin yojna

संबंधित बातम्या

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर
1

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ
2

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
3

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
4

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.