Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चौघांना ताब्यात घेतलं मात्र यामधील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झाले आहेत

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2024 | 06:11 PM
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : एपीएमसी मार्केट परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अवघ्या तासाभरात पोलिसांनी सापळा रचत चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्यात. त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झाले आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये गुजरात हुन येणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांच्या वाहनांवर दरोडा घालून लुटण्यासाठी काही दरोडेखोर मार्केट परिसरात जमले असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याची हवालदार सचिन साळवी व पोलीस शिपाई आंधळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलीस निरीक्षक विनोद केलेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते यांच्या पथकाने एपीएमसी मार्केट परिसरात सापळा रचला. या ठिकाणी काही इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या इसमांवर झडप टाकली.

चौघांना ताब्यात घेतलं मात्र यामधील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झाले आहेत. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तीन धारदार चाकू, नायलॉनची रस्सी, मिरचीचा स्प्रे, रोकड तसेच एक रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: The market police handcuffed the robbers who were preparing to commit the robbery kalyan crime case thane crime case maharashtra crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • kalyan crime case
  • Kalyan Police
  • Maharashtra Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.