शिर्डी : देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी (Sai Baba Temple) मोठी गर्दी होत शिर्डीत होत असते. अनेकदा तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा आकडा आणि मंदिराला मिळणाऱ्या देणगीचा आकडा हा तिरुपती बालाजी (Tirupati Balaji) या दक्षिणेतील प्रसिद्ध मंदिराच्या जवळपास असतो. देशातील सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या मंदिरांच्या यादीत साईबाबा मंदिर देवस्थानाचा समावेश आहे. यावर्षी मात्र उन्हाचा तडाखा जास्त असल्यानं भाविकांची संख्या रोडावली असल्याचं दिसतंय.
उन्हाळ्याच्या काळात किती जणांनी घेतलं दर्शन?
25 एप्रिल ते 15 जून या काळात देश-विदेशातील सुमारे २६ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. भाविकांनी या काळात ४७ कोटी ७८ लाखांच्या देणग्याही साईबाबांच्या चरणी अर्पण केल्या आहेत. सशुल्क दर्शन आणि आरतीच्या माध्यमातून ११ कोटी ५५ लाख रुपयांचं उत्पन्न संस्थानाला झालेलं आहे. गेल्या वर्षी याच काळात शिर्डीला येणाऱ्यांचची संख्या प्रचंड होती. कोरोनाचा काळ सरला होता, त्यामुळं अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावत होते. गेल्या वर्षी या दोन महिन्यांच्या काळात ५५ कोटींचं दान साईबाबांच्या चरणी अर्पण झालं होतं. गर्दीत यंदा थोडी घट झाल्यानं देणगीत ८ कोटींची घट झाल्याचं दिसतंय.
सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामीचे प्रयत्न
श्री साईबाबा आणि शिर्डीतील साईबाबा संस्थानाबाबत बदनामीकारक चुकीचं वृत्त पसरवण्याता येत असल्याच्या तक्रारी आता संस्थानापर्यंत येत आहेत. याबाबतची तक्रार सायबर सेलकडे आणि पोलिसांत करण्यात आली आहे. भाविकांनी या मेसेजेसवर विश्वास ठएऊ नये, असं आवाहनही संस्थानच्या वतीनं करण्यात येतंय. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे आवाहन केलेलं आहे.
साई चरणी दोन हजारांच्या 12 हजार नोटा
रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिर्डीत २० मे ते १५ जून या काळात २ हाजारांच्या १२ हजार नोटा आल्या आहेत. यातून संस्थानाला २ कोोटी ४० लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.