Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“3 हजार कंत्राटी पोलीस भरती नेमण्याचा आदेश कुणाच्या भल्यासाठी व कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला?”, खा. सुप्रिया सुळे यांचा सवाल, म्हणाल्या…

शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही?

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 12, 2023 | 01:09 PM
“3 हजार कंत्राटी पोलीस भरती नेमण्याचा आदेश कुणाच्या भल्यासाठी व कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला?”, खा. सुप्रिया सुळे यांचा सवाल, म्हणाल्या…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. पण कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती का? असा सवाल उपस्थित करण्यात येत असताना, आता यावर विरोधकांनी देखील टीका केली आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (Maharashtra State Security Corporation) कंत्राटी पद्धतीनं (Contract Method) जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. (the order to appoint three thousand contract police recruits was issued for whose benefit and to warm whose pockets supriya sule question)

…तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश… pic.twitter.com/zMEhU2JW3r — Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2023

कुणाचा खिसा गरम करण्यासाठी…

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना, खासदार सुप्रिया सुळेंनी या कंत्राटी भरतीवर टिका केली. तसेच ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “…तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही? मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे? पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरूण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय? गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे.”, असं ट्विटच्या माध्यमातून सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

कोणत्या कारणासाठी भरती…

मुंबईत विविध जाती धर्माचे सण, उत्सव असले की, पोलिसांवर ताण येतो. तसेच गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, रमजान आदी सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही पोलीस भरती करण्यात येत आहे. यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही कंत्राटी पोलीस भरती करण्यात येणार आहे. तसेच मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. तर राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Web Title: The order to appoint three thousand contract police recruits was issued for whose benefit and to warm whose pockets supriya sule question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2023 | 01:09 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
1

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
2

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात
4

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.