Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : “…अन्यथा आंदोलन करु”; उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप

शहरातील बापट मळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महावीर उद्यानाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2026 | 03:34 PM
Sangali News : “…अन्यथा आंदोलन करु”; उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप
Follow Us
Follow Us:
  • …अन्यथा आंदोलन करु,
  • उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप
सांगली :  शहरातील बापट मळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महावीर उद्यानाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. झाडे सुकणे, परिसरात अस्वच्छता, कचरा व भंगार न उचलणे, व्यायामाची साधने नादुरुस्त होणे, लहान मुलांच्या खेळण्यांना गंज लागणे, तसेच पिण्याच्या पाण्याची अस्वच्छ व्यवस्था यामुळे उद्यानाची स्थिती चिंताजनक बनली आहे. उद्यानातील अनेक झाडे जळाल्याचे व सुकत चालल्याचे चित्र दिसत आहे. झुडपे अनियंत्रितपणे वाढल्यामुळे परिसरात साप फिरत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. लॉनची देखभाल न झाल्याने हिरवाई नष्ट होऊन मोकळे मैदान ओसाड दिसू लागले आहे. नागरिकांची मोठी वर्दळ; तरीही दुर्लक्ष होत आहे. बापट मळा येथील हे उद्यान शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण मानले जाते. दररोज पहाटे शेकडो नागरिक येथे मॉर्निंग वॉक, योगासने व व्यायामासाठी येतात. दिवसभर नागरिकांची वर्दळ असते, तर सायंकाळी लहान मुलाची मोठी गर्दी येथे होते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा कोलमडल्याने नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावीर उद्यान हे एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याचे केंद्र आहे. मात्र सध्या येथे अस्वच्छता, तुटलेली साधने आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने तात्काळ लक्ष न दिल्यास आम्ही आंदोलन छेडू.
– महेश खराडे, बापट मळा कृती समिती

सुरक्षित व सुस्थितीत उद्याने नागरी हक
शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत सार्वजनिक उद्याने मिळणे हा मूलभूत नागरी हक्क मानला जातो. कराच्या स्वरूपात नागरिकांकडून निधी जमा होत असताना अशा सुविधांची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शहरातील उद्याने ही केवळ फिरण्यासाठीची ठिकाणे नसून ती नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावी केंद्रे असतात. महावीर उद्यानासारखी ठिकाणे शहराच्या जीवनमानात मोठा वाटा उचलतात. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ दुरुस्ती व स्वच्छतेची मागणी केली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण… पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन

अंधार, असुरक्षिततेचे सावट असल्याने भीती

बापट मळा येथील महावीर उद्यानात रात्रीच्या वेळी अपूर्ण प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात जात आहे. या अंधाराचा गैरफायदा घेत उद्यानातील काही छुप्या ठिकाणी युगुलांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच उद्यानाबाहेरील व आतील अंधाऱ्या भागात नशेड्या युवकांचा वावर वाढल्याचे चित्र असून, काही ठिकाणी खुलेआम व्यसन करताना युवक दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तात्काळ प्रकाशयोजना व पोलीस वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

Kolhapur News : नियमबाह्य खतविक्रेत्यांना कृषी विभागाचा दणका ; 45 विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर 5 जणांचे रद्द

 

Web Title: The poor condition of mahavir park in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
3

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Maharashtra Weather:  राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.