Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचा दिमाखात प्रारंभ! अनेक मान्यवरांची लागली हजेरी

शिरोली येथील दिशा इंग्लिश मिडियम स्कूल व छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचा दिमाखात प्रारंभ झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 16, 2025 | 08:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • दिशा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचा दिमाखात प्रारंभ
  • अनेक मान्यवर उपस्थित होते
  • विद्यार्थ्यांना क्रीडासह शिक्षणातही उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या
शिरोली येथील पेठवडगांव परिसरातील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज तसेच दिशा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचा दिमाखात प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, शारीरिक व मानसिक विकासाला चालना देणे आणि संघभावना वृद्धिंगत करणे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभ महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनच्या कोचिंग कमिटीचे चेअरमन व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील तसेच उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

बाप रे बाप! पुण्यनगरीची हवा ‘विषारी’; तब्बल ४८ दिवसांपासून हवेची गुणवत्ता…; तज्ञांनी व्यक्त केली नाराजी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक परेड संचलन सादर करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर कुस्ती, योगा, जंपरोप, मल्लखांब, लाठीकाठी, कराटे आदी विविध खेळप्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली, ज्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. या सोहळ्यास उद्योजक गौरव रुग्गे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नितीन पडियार, ग्रामपंचायत बाचणीचे लोकनियुक्त सरपंच एम. डी. कांबळे, संस्थेच्या सचिव व वारणा सहकारी बँकेच्या संचालिका सुवर्णा माने, संस्था खजिनदार बापूसो माने, मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील, कॅप्टन सुरेश आडसूळ, जिमखाना विभाग प्रमुख आनंद पाटील, क्रीडा महोत्सव प्रमुख सुजित पाटील, दिशा क्रीडा महोत्सव प्रमुख प्रतिक्षा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अजित पाटील यांनी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यश निश्चितच मिळते, असे सांगत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने परिश्रम करण्याचा मौलिक सल्ला दिला. तर पैलवान अमृत भोसले यांनी परिस्थितीचा बाऊ न करता गुरूंवर विश्वास ठेवून मेहनत करणारे विद्यार्थीच विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करतात, असे मत व्यक्त केले. संस्थेच्या वतीने चौफेर शिक्षण, शिस्त, क्रीडा आणि संस्कार यांचा समन्वय साधणाऱ्या या शिक्षण संकुलाबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र माने यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना क्रीडासह शिक्षणातही उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: The sahyadri annual sports festival has begun in grand style

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • Sahyadri Sugar factory Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.