• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pmpml Buses Passenger Filed 34843 Complaints In Year At Pune City

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

पीएमपीची हेल्पलाइन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते. या कक्षात १२ कर्मचारी कार्यरत आहेत. कंट्रोल रूममध्ये आलेल्या तक्रारी संबंधित आगाराकडे पाठवल्या जातात.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 16, 2025 | 11:30 PM
Pune News: 'PMP'मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात...

पीएमपीमध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वाधिक तक्रारी चालक व वाहनांसंदर्भात
वर्षभरात ३४ हजार ८४३ तक्रारी दाखल
पुण्याची जीवनवाहिनी म्हणून पीएमपीची ओळख

चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणेकरांची जीवन वाहिनी असलेल्या पीएमपीविरोधात तक्रारींचा धो-धो पाऊस पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वच्छता, चालक, वाहक तसेच मोबाईल ॲप यासंदंर्भातील या तक्रारी असून, जवळपास १५ विविध कारणे देत पुणेकरांनी पीएमपीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांना ‘सेवा’ पुरविणाऱ्या पीएमपीला आणखी सुधारणा करण्याची अत्यंत गरज असल्याचे दिसत आहे. चालू वर्षात तब्बल ३५ हजार तक्रारी आल्या आहेत. आता या तक्रारीवरून प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली, हा संशोधनाचा विषय होईल.

पीएमपी सेवा ही पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. लाखो प्रवासी यामधून दररोज प्रवास करतात. त्यामुळे याला विशेष महत्व आहे. पण, अनेकवेळा प्रवाशांना या पीएमपीचा त्रास सहन करावा लागतो. कधी पीएमपीमध्येच बंद पडते, तर कधी पीएमपी थांब्यावर थांबतच नाही. ती वेळेवर कधी पोहचतच नाही,अशा प्रमुख समस्यांनी प्रवाशी वैतागलेले असतात. त्यात आता प्रशासनाने प्रवाशांसाठी सुरू केलेले पीएमपीएलचे ऑनलाईन सेवा, पीएमपीमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य झालेले असते. प्रचंड दुर्गंधी प्रवाशांना सहन करावी लागते. त्यासोबतच चालक व वाहक यांच्या बोलण्याचा ‘टोन’ प्रवाशांसोबत उर्मट, किंवा आवाजावी मोठा असतो. विशेष म्हणजे, चालक व वाहक यांच्यासंदंर्भात सर्वाधिक तक्रारी चालू वर्षात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चालक व वाहक यांची ‘शाळा’ घेण्याची गरज निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

येवढे तक्रारी येत असताना देखील बस सेवेत अपेक्षित सुधारणा होताना दिसून येत नाहीत. प्रवाशांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींकडे प्रशासन गांभीर्याने पाहात नसल्याचा आरोप होत असून, तक्रारी ‘निकाली’ काढल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात समस्या तशाच आहेत. पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून रोज १० ते ११ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासादरम्यान बस थांब्यावर न थांबवणे, गाडी उशिरा आणणे, अस्वच्छ बस, नवीन मार्गांची मागणी, सिग्नल न पाळणे, वेगाने वाहन चालवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या जात आहेत. परंतु, या तक्रारी सोडवण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

असे होते तक्रारींचे निवारण

पीएमपीची हेल्पलाइन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते. या कक्षात १२ कर्मचारी कार्यरत आहेत. कंट्रोल रूममध्ये आलेल्या तक्रारी संबंधित आगाराकडे पाठवल्या जातात. त्यात आगार स्तरावर (तृतीय स्तर) तक्रार सुटली नाही, तर ती दुय्यम स्तरावर सहव्यवस्थापकीय संचालकांकडे जाते. तेथेही न सुटल्यास पीएमपीचे अध्यक्ष स्वतः लक्ष घालून तक्रार सोडवतात.सर्वाधिक नोंद झालेल्या तक्रारी

१ जानेवारी ते ७ डिसेंबर पर्यत जवळपास वर्षभरात प्राप्त तक्रारीचे माध्यम

व्हॉट्सॲप : १५,४६२

वेबसाईट : १३,३०७

कॉल सेंटर : ४५१०

ई-मेल : ९६९

एसएमएस : ५८०

इंस्टाग्राम : ६

फेसबुक : ५

मोबाईल ॲप : ४

तक्रारीचे प्रकार आणि संख्या

तक्रारीचा प्रकार संख्या

चालक व वाहक संबंधित तक्रारी ८९५९

मोबाईल अॅहप / संकेतस्थळ संबंधित तक्रारी ६५९३

चालक व वाहक संबंधित तक्रारी (भाडे तत्त्वावरील बसेस) ६२३७

सूचना व प्रशंसापत्रे ५०२७

सूचना व प्रशंसापत्रे ५०२७

पीएमपीएमएल बस देखभाल तक्रारी ९६२

भाडे तत्त्वावरील बस देखभाल तक्रारी ७९१

बसथांबा संबंधित तक्रारी ६०६

इतर १,२८२

एकूण तक्रारी : ३४,८४३

पीएमपीएकडे ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या सर्व तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. पीएमपीने दहा ते अकरा लाख प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत या तक्रारी खूप कमी आहेत. तक्रारी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

सतीश गव्हाणे,

जनरल मॅनेजर, पीएमपी

भर रस्त्यात पीएमटी बसचा ब्रेक फेल झाला अन्…; ड्रायव्हर आणि कंडक्टरने केलं असं की टळली मोठी दुर्घटना, Video Viral

येथे तक्रार करावी

दूरध्वनी क्रमांक

०२०-२४७५४५४५४

एसएमएस, मोबाईल, व्हाट्सअप क्रमांक

९८८१४९५५८९.

ई-मेल आयडी

complaints@pmpmi.org

संकेतस्थळ

www.pmpml.org

Web Title: Pmpml buses passenger filed 34843 complaints in year at pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • PMPML Bus
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी
1

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत
2

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव
3

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार
4

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

Feb 15, 2026 | 03:07 PM
IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील

IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील

Feb 15, 2026 | 03:06 PM
छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

Feb 15, 2026 | 03:03 PM
Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल

Feb 15, 2026 | 03:00 PM
Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

Feb 15, 2026 | 02:55 PM
Sambhajinagar 250 coror scam: क्यूआर कोड एकाचा, वर्क ऑर्डर दुसऱ्याची; संभाजीनगर PWD विभागात २५० कोटींचा घोटाळा

Sambhajinagar 250 coror scam: क्यूआर कोड एकाचा, वर्क ऑर्डर दुसऱ्याची; संभाजीनगर PWD विभागात २५० कोटींचा घोटाळा

Feb 15, 2026 | 02:55 PM
Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Feb 15, 2026 | 02:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.