Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2024 | 01:15 PM
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

Follow Us
Close
Follow Us:

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचं हत्यार उपसल्यानं लाखो प्रवाशांना फटका बसला आहे. संपाचा आज सलग दुसरा दिवस आहे. यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात तब्बल १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आज कामगार संघटनांची बैठक आहे. या बैठकीनंतर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज (4 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे. त्यात मागण्यांवर चर्चा होईल. आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल. त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे.

मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संपकरी कामगारांना दिलासा देण्याचे आवाहन करतानाच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या मंगळवारी मुंबई दौऱ्यावर असल्याकारणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यामध्ये व्यस्त होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी कर्मचारी संघटनांना त्यांच्या सह्याद्री किंवा शासकीय निवासस्थानी चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यामधून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “बैठकीत सकारात्मक चर्चा होईल गणेशोत्सव जवळ आला असल्याकारणानं अनेक नागरिक खरेदी-विक्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करत असतात. याकरता माझं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी संप करू नये. याबाबत सकारात्मक चर्चा करून आणि चर्चेतून प्रश्न सुटेल.” , अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली.

एसटी संपाची व्याप्ती वाढली

महामंडळाकडून कंत्राटी कर्मचारी नेमण्याची तयारी असतानाच राज्यात एसटी संपाची व्याप्ती सध्या वाढली आहे. एसटीच्या राज्यभरातील २५१ आगारांपैकी १०० आगार पूर्णतः बंद आहेत. ८२ आगार अंशतः सुरू आहेत. तर ६९ आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मराठवाडा २६ आगार पुर्णतः बंद तर खान्देशात ३२ आगार पुर्णतः बंद आहेत. यामुळे संपाची तीव्रता अधिक आहे. तर मुंबई-पुणे मार्गावरील ई- शिवनेरी बस सेवा सुरळीत सुरू आहे.

मंगळवारी ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर …आज सकाळी 8 वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.

सर्वाधिक गैरसोय आज जाणाऱ्या गणेश भक्तांची होऊ शकते. सुमारे १ हजार बसेस मुंबई, ठाणे व पालघर विभागातून आज रवाना होत आहेत. दुर्दैवाने संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होऊ शकते. तसेच एसटी प्रशासन वारंवार संपकरी कर्मचार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत आज बैठक होणार आहे.त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन ,चांगला निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतो. तरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे! प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: The st bus strike has increased 96 out of 251 depots completely shut down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.