
पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू
तिघेही आरसीसीपीएल लाईमस्टोन माईन्स, परसोडा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. पहाटेच्या सुमारास तिघेही (एमएच ३४ बीटी २१२०) दुचाकीने कोरपना येथून कामावर जात होते. दरम्यान, परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अशातच विरुद्ध दिशेने राँग साईडने येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात प्रमोद भाऊराव किन्नाके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रणय मुके याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
तर वैभव राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमींना कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद रहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार व कोरपना पोलिस करीत आहेत.
धुके धोकादायक
मागील दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे धुके पडत असल्याचे चित्र पहायला मिळते. यामुळे वाहनधारकांना महामार्गावरून वाहने चालवितांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाहनचालकांनी सावधानता बाळगून वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Ans: प्रमोद भाऊराव किन्नाके (वय २६) आणि प्रणय मुके (वय २८) अशी मृत सुरक्षा रक्षकांची नावे आहेत.
Ans: रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव-चनई खुर्द फाट्यादरम्यान हा अपघात घडला.
Ans: वैभव रमेश राऊत (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.