The teacher took a jump in the Wardha river and left home as he was getting a facial for his own wedding
तळेगाव (शा.पंत) : तळेगाव (Talegaon) नजीकच्या वर्धा नदीच्या (Wardha river) पात्रात एका शिक्षकाने उडी (Jumped by a teacher) घेतल्याची घटना घडली. उडी घेतलेल्या शिक्षकाचे नाव विनोद केशव बागवाले (Vinod Keshav Bagwale) (वय ५२) असून, त्यांचे येत्या १८ तारखेला लग्न असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
गुरुवारी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नदीत उडी घेत असल्याचे काहींना दिसल्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार आशीष गजभिये (Thanedar Ashish Gajbhiye) हे आपल्या मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. ठाणेदार गजभिये यांनी तत्काळ मदतीसाठी यंत्रणांना संपर्क करून यंत्रणा उभी केली. परंतु, वर्धा नदीच्या पात्रात आता अप्पर वर्धा धरणाचे (Upper Wardha Dam) पाणी सोडल्याने नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांना शोधकार्य करताना अडचणी येत होत्या.
तीन दिवसांनी होते लग्न
नदीच्या पात्रात उडी घेतलेल्या शिक्षकाचे येत्या १८ तारखेला म्हणजे चार दिवसांनी लग्न ठरले होते. अमरावतीच्या मुलीशी त्यांचे लग्न होणार होते. सदर शिक्षक हे काटोल (Katol) येथील नबीरा महाविद्यालयात (At Nabira College) इकॉनॉमिक्स शिकवत( teaching economics) होते. त्यांच्या नागपूर( nagpur) येथील राहत्या घरून ते लग्न असल्याने चेहऱ्याला फेशियल करून येतो, असे म्हणून निघाले होते. पण, त्यांनी अचानक तळेगाव नजीकच्या वर्धा नदीजवळ येऊन उडी का घेतली, हे न समजलेले कोडे आहे.