पाचगणी : गेले विस दिवस सहयाद्रीच्या डोंगरमाथ्यावरील कास परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाची मुसळधार सुरू असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे घरांच्या भिंती कोसळून पत्रे कौले ऊडून पडझड झाली असल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.
सातारा तालुक्यातील जुंगटी गावाचे रहिवासी धुळाजी जानू कोकरे यांच्या राहत्या घराची भिंत शुक्रवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली असुन कौले ढाप ऊपसल्याने घराचे नुकसान झाले आहे. गावातील अन्य घरांचीही कौलेही वाऱ्याने ऊपसून पझझड झाली आहे. जळकेवाडीतील ठकाराम रामचंद्र शिंदे यांच्या घराची भिंतही कोसळली आहे. व या गावांशेजारीच असणाऱ्या जावली तालुक्यातील कात्रेवाडी गावातील सुगंदा पांडूरंग सावंत यांच्या घराची भिंतही मोठया प्रमाणात कोसळली असून घरांच्या पडझडींचे सत्र सुरु झाले आहे.
पावसामुळे विजपुरवठा खंडीत
मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांच्या पडझडी सोबतच या भागातील धावली, जुंगटी, तांबी, भांबवली, कास, पाली, जळकेवाडी, कात्रेवाडी, कारगाव, पिसाडी या गावातील विजपुरवठा गेले चार दिवस खंडीत झाल्ाा आहे. शेतीच्या बांधांचीही मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. पाळीव गाई म्हैशी बकरी आदी प्राणी थंडीने गारठून मरू लागल्याने शेतकरी चिंताग्रत झाला आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.